महापरिनिर्वाण दिन निमित्त मुंबई करिता आदिलाबाद ते दादर एक विशेष गाडी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Friday, December 2, 2022

महापरिनिर्वाण दिन निमित्त मुंबई करिता आदिलाबाद ते दादर एक विशेष गाडी

  किनवट (नांदेड ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड रेल्वे विभागातून मुंबईला जाण्या करिता आदिलाबाद ते दादर ही विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. 

      या रेल्वेचे वेळापत्रक  पुढील प्रमाणे : 1. गाडी क्रमांक 07058 आदिलाबाद ते दादर विशेष गाड़ी : गाडी संख्या 07058 आदिलाबाद ते दादर हि विशेष गाडी आदिलाबाद येथून दिनांक 05 डिसेंबर- 2022 ला सोमवारी सकाळी 07.00 वाजता सुटेल आणि किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण मार्गे दादर येथे मंगळवारी सकाळी 03.30 वाजता पोहोचेल.

          2. गाडी क्रमांक 07057 दादर ते आदिलाबाद विशेष गाडी: गाडी संख्या 07057 दादर ते आदिलाबाद हि विशेष गाडी दादर येथून दिनांक 07 डिसेंबर 2022 ला बुधवारी रात्री 00.50 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, किनवट मार्गे आदिलाबाद येथे बुधवारीच सायंकाळी 18.45 वाजता पोहोचेल.

        या गाडीत 08 जनरल आणि 02 एस. एल. आर. असे 10 डब्बे असतील.


गाडीचे थांबे आणि वेळापत्रक पुढील प्रमाणे


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News