कयाधू – पैनगंगा महोत्सवांतर्गत भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन# विधानसभा निहाय प्रथम येणाऱ्या तीन विजेत्या स्पर्धकांना खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील संसदीय अधिवेशन अभ्यास दौऱ्यावर जाण्याची नामी संधी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 3, 2022

कयाधू – पैनगंगा महोत्सवांतर्गत भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन# विधानसभा निहाय प्रथम येणाऱ्या तीन विजेत्या स्पर्धकांना खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील संसदीय अधिवेशन अभ्यास दौऱ्यावर जाण्याची नामी संधी

 


नांदेड, ता.३ : खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती हिंगोली लोकसभेच्या वतीने देण्यात आली. 

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हिंगोली लोकसभा मतदार संघात भर गच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.सहा) पासून सुरु होत असलेल्या या वक्तृत्व स्पर्धेत १६ ते २८ वयोगटातील स्पर्धकांना  सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बदललेली महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा, विकासाभिमुख नेतृत्व मा.खासदार हेमंत पाटील, माझा विधानसभा मतदार संघ व विकासाची माझी संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीतून समृद्धीकडे, वाचन संस्कृती काळाची गरज, मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष व शेतीची दुरावस्था, एक कुटुंब अनुभवाचा संपन्न वारसा असे सात विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांना आपले विचार मांडण्यासाठी पाच ते सात मिनिटाचा वेळ देण्यात आला आहे.

सहा विधानसभानिहाय आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार, द्वितीय पारितोषिक तीन हजार आणि तृतीय पारितोषिक दोन हजार तर उत्तेजनार्थ एक हजार रुपयाचे बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विधानसभा निहाय स्पर्धेतील प्रथम तीन येणाऱ्या एकुण १८ विजेत्या स्पर्धकांना खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील संसदीय अधिवेशन अभ्यास दौऱ्यावर पाठवले जाणार असल्याची कयाधू-पैनगंगा महोत्सव समिती हिंगोली लोकसभेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.  


 विधानसभा क्षेत्रा नुसार वक्तृत्व स्पर्धा (महोत्सव)

मंगळवार (दि.सहा) महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय - कळमनुरी, बुधवार (दि.सात) राजेसंभाजी कनिष्ठ महाविद्यालय - हिंगोली, गुरुवार (दि.आठ) माहेश्वरी भवन - हदगाव, शुक्रवार (दि.नऊ) श्रीराम मंगलम कार्यालय ढाणकी रोज - उमरखेड, शनिवार (दि.दहा) महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदा- किनवट, सोमवार (दि.१२) मुक्ताई सभागृह लिटल किग्ज इंग्लीश स्कुल आसेगाव रोड - वसमत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News