विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा -राजश्री पाटील; यांच्या उपस्थितीत किनवटला वक्तृत्व स्पर्धेचे उद्धघाटन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, December 10, 2022

विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा -राजश्री पाटील; यांच्या उपस्थितीत किनवटला वक्तृत्व स्पर्धेचे उद्धघाटन

 


किनवट (नांदेड ) ता. १० : वक्तृत्व स्पर्धेला बोलणाऱ्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्यास श्रोत्यांची भाषणे ऐकण्यास श्रोते येतील का हा आयोजकां समोरील सर्वात मोठा प्रश्न असतो. मात्र खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेस आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा असा मोठा प्रतिसाद मिळाला आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य हेतुच विद्यार्थ्यांमधील वक्ता सदैव जागे राहावा असाच आहे. तो हेतु साध्य झाला असल्याचे वक्तव्य राजश्री पाटील यांनी येथे केले. 

         खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली लोकसभा मतदार संघात सहा दिवसीय कयाधू-पैनगंगा महोत्सवा अंतर्गत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती खासदार चषक भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (ता.१०) किनवट येथील महात्मा जोतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून राजश्री पाटील बोलत होत्या.


     याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्माणीवार, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, शहर प्रमुख सुरज सातूरवार, भाजपचे धरमसिंग राठोड, माहूर उपतालुका प्रमुख हनुमंतराव मुंडे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, मनोज तिरमनवार, शिवराज राघू मामा, पंढरीनाथ ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम, घनश्याम कऱ्हाळे, कपिल रेड्डी, चंद्रकांत जयभाये, भाऊराव राठोड, प्रा. सुरेश कटकमवार, सोनू माने, साई पलेपवाड, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, शेख अजीज, शेख अफसर, मोहसीन, गजानन जाधव, किनवट तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, माजी गट शिक्षणाधिकारी अरुणकुमार वतनीवकील, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, प्राचार्य शुभांगी ठमके व महेंद्र नरवाडे यांची उपस्थित होती.

         या कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या किनवटच्या तहसीलदार तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांनी स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वक्तृत्व स्पर्धे बद्दल पुढे बोलताना राजश्री पाटील म्हणाल्या की, खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भजन, किर्तन, प्रवचन सारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असते, त्यास श्रोत्यांना बोलावण्याची गरज पडली नसती, परंतु माझ्या मतदार संघातील तरुणवर्गास युवा पिढीच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, विचार त्यांच्या भावना समजुन घेण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेसारखे दुसरे उपसयुक्त माध्यम नाही. त्यामुळे आज या स्पर्धेस वक्ते आणि श्रोत्यांची संख्या मर्यादित वाटत असली तरी, पुढील वर्षी मात्र या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आणि श्रोत्यांची संख्या मोठी असेल त्यासाठी मतदार संघ निहाय वक्तृत्व स्पर्धेची कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी अजय झरकर, किर्ती तगडपल्लेवार, पंकज मोरे यांनी परिक्षण केले, उत्तम कानिंदे यांनी सुत्रसंचलन केले, सुनिल गरड यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News