विविध कृतीशील कार्यक्रमातून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, December 6, 2022

विविध कृतीशील कार्यक्रमातून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 


किनवट ता.६ : महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (ता.६) शहर व परिसरात विविध कृतीशील कार्यक्रम घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन  करण्यात आले. अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम सकाळी १० वाजता डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ झाला. 

          प्रारंभी भारतीय बोद्ध महासभेच्या वतीने तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव, रिपाइंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक व तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, डॉ.अशोक बेलखोडे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, श्रीनिवास नेम्माणीवार, अभय महाजन, ऍड.जी.एस.रायबोळे, देविदास मुनेश्वर, एपीआय विशाल वाठोरे, माधव कावळे, सुरेश जाधव, मिलिंद धावारे, राजाराम वाघमारे, शंकर नगराळे, प्रा.जाधव, उपशाम भगत,भारत गोफणे, चंद्रकांत दुधारे, व्यंकटराव नेम्माणीवार, अशोक नेम्माणीवार, के.मुर्ती, राजेश पाटील, गंगुबाई परेकार,भावना दिक्षित, विद्याताई पाटील, ऍड.मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे , दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड , दिलिप पाटील, संपादक साजिद बडगुजर, विजय जोशी, मलिक चव्हाण ,प्रा. डाॅ. आनंद भालेराव, खंडुजी मुनेश्वर , लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनिल उमरे, गंगाधर कदम व महेंद्र नरवाडे यांनी सामुहिक वंदना घेतली.  उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. 


         कलावती ब्लड बँक, आदिलाबाद, गुरुगोविंदसिंहजी ब्लड बँक, नांदेड व साने गुरुजी पॅथालाजी लॅब,किनवट यांच्या सौजन्याने  रक्तदान शिबीर व एक वही एक पेन अभियानाचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे मुख्य  आयोजक ऍड. सम्राट सर्पे व निखिल कावळे हे होते.यावेळी अनेक शिव-फुले -शाहू-आंबेडकरी जनतेंनी रक्तदान करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना व २६/११च्या हल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभिवादन केले. यात तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 

            रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी सतिष कापसे, संघर्ष घुले,आकाश सर्पे,शुभम पाटील,स्वप्नील सर्पे,सुगत नगराळे,पवण सर्पे, प्रतिक नगराळे आदी युवा पॅन्थरनी पुढाकार घेतला होता. सायंकाळी सात वाजता "गाणे निळ्या नभाचे"हा अभिवादनपर संगिताचा कार्यक्रम होणार आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News