मंत्री चंद्रकांत पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा,या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 12, 2022

मंत्री चंद्रकांत पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा,या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन

 


किनवट,दि.१२: बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणिवपूर्वक अवमान करणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटिल यांचा तात्काळ राजिनामा घेऊन त्यांच्यावर ऍट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व समता सैनिक दलाचे मनोज गिरबडे यांच्यावर शाईफेक प्रकरणी दाखल केलेले गंभीर गुन्हे परत घ्यावेत,या मागणीसाठी आज (दि.१२) सकाळी ११वाजेच्या सुमारास शहरातील जिजामाता चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

   यावेळी शिव -फुले-शाहू -आंबेडकर प्रेमी युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासंदर्भात सर्व संबंधितांना निवेदन देण्यात आले. यावेळी 'पीरिपा,'चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, सुरेश मुनेश्वर, ऍड.सम्राट सर्पे, निखिल कावळे, निवेदक कानिंदे, राजु कांबळे, निखिल सर्पे, राजू शेळके, निखिल वाघमारे, राजू नरवाडे, सुगत नगराळे, सतीश कापसे, प्रवीण गायकवाड, प्रतीक नगराळे, शुभम पाटील, संघर्ष घुले, सुधीर टाक, विकास कुडमेथे, सुगत भरणे, आनंद कावळे, अभय नगराळे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News