अभि. प्रशांत ठमके, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांचेसह बच्चेवार, बियाणी, माळोदे, राऊत, ठाकूर, डाॅ.सुर्यवंशी, पोपूलवार, एडके, ॲड. बंडेवार आदींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 12, 2022

अभि. प्रशांत ठमके, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांचेसह बच्चेवार, बियाणी, माळोदे, राऊत, ठाकूर, डाॅ.सुर्यवंशी, पोपूलवार, एडके, ॲड. बंडेवार आदींना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार जाहीर

 



हिमायतनगर (नांदेड ) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडच्या वतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून अभि. प्रशांत ठमके, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, बालाजी बच्चेवार, गोवर्धन बियाणी, एस.जी. माळोदे, अविनाश राऊत, बि.एन. ठाकूर, डाॅ. अनंत सुर्यवंशी, उपा.जनाबाई पोपलवार, आर. एच.एडके, ऍड. राणीपद्मावती बंडेवार, श्रीनिवास मुगावे आदी मान्यवर यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. एक दिवशीय सहाव्या बौद्ध धम्म परिषदेत येत्या दि.४ जानेवारीला या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बौध्द धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर यांनी आज दिली.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेड च्यावतिने दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी निवड समिती प्रमुख सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर, डॉ.पि.बी.नामवाड, डाॅ.इरवंत पल्लेदार, त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या समितीने सन २०२२-२३ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

   भारतीय बौद्ध महासभेचे किनवट तालुकाध्यक्ष अभि.प्रशांत ठमके, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी एस.जी. माळोदे, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.वनसंरक्षक बि.एन.ठाकूर, फिनिक्स हाॅस्पिटलचे डाॅ. अनंत सुर्यवंशी, सेवानिवृत्त शिक्षिका उपा.जनाबाई पोपलवार, हिंगोलीचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी आर.एच.एडके, हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बि.एस.चव्हाण, सेवानिवृत्त उप अभियंता श्रीराज भवरे, किनवटचे गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बि.डी.भुसनूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणे च्या समतादूत ऍड. राणीपद्मावती परमेश्वर बंडेवार, डॉ.राजेंद्र वानखेडे, भोकरचे सहा.पोलीस निरीक्षक अनिल कांबळे, म.रा.ग्रामसेवक युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, साहित्यिक डाॅ.मारोती वाघमारे आंदेगांवकर या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२२-२३ जाहीर करण्यात आला आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने आयोजित एकदिवशीय सहावी बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा, ता.हिमायतनगर येथे दि.४ जानेवारी २०२३ रोजी किनवटचे आ. भीमराव केराम, हदगांव- हिमायतनगरचे आ.माधवराव पा.जवळगांवकर, नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे, मा.आ.नागेश पाटील आष्टीकर, मा.आ.विजय खडसे, नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर, माजी महापौर शीलाताई भवरे, बाबुराव पाटील कदम कोहळीकर आदी धार्मिक, राजकीय- सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक तथा बौद्ध धम्म परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे, स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे, निमंत्रक सुधाकर पाटील सोनारीकर, माजी सभापती जोगेंद्र नरवाडे, कैलास पाटील माने, बालाजी राठोड, आयोजक लक्ष्मणराव मा.भवरे, अनिल मादसवार, डॉ.मनोज राऊत, प्रताप नरवाडे, राहुल लोणे, संघपाल कांबळे, डॉ.सारीपुत्र गोखले, शेख खय्युम, शाहीर नरेंद्र दोराटे, शाहीर रमेश नारलेवाड, शाहीर सुभाष गुंडेकर, शिवाजी डोखळे, जळबा जळपते, नागनाथ वच्चेवाड, परमेश्वर वानेगांवकर, अविनाश कदम आदींनी दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News