मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला -पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 15, 2022

मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यानाचा मान स्व. मुंडे उद्यानाला -पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

 



मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : कांदिवली पूर्व विधानसभेतील लोखंडवाला संकुल येथे उभारण्यात आलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान हे मुंबईतील सर्वश्रेष्ठ उद्यान ठरले आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे उद्यान म्हणजे एखादा प्रकल्प अधिकाधिक सुंदर आणि लोकोपयोगी कसा होईल हे दर्शवणारे असेच आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.


यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते. श्री. लोढा म्हणाले, आमदार भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पूर्व विधानसभेत विविध विकास कामे झाली आहेत. आत्तापर्यंत वांद्रे येथील जिओ उद्यान हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते, मात्र गोपीनाथ मुंडे उद्यान हे त्यापेक्षाही सुंदर आणि दर्जेदार असे झाले आहे.


            यावेळी खा. शेट्टी म्हणाले, या गोपीनाथ मुंडे उद्यानामुळे कांदिवली पूर्व विधानसभेच्या सौदर्यात भर पडली आहे. अत्यंत उपयुक्त अस प्रकल्प आ. अतुल भातखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.


आमदार अतुल भातखळकर म्हणाले, येथील पाच एकरच्या भूखंडावर जंगल होते. परिसर अस्वच्छ होता. येथील नैसर्गिक सौंदर्य कोठेही नष्ट न करता आम्ही हे उद्यान बनवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे विलोभनीय शिल्प साकारण्यात आले आहे. मुंबईतील पहिला वहिला अंडरग्राउंड पार्किंगचा पायलेट प्रोजेक्ट येत्या काळात पूर्ण होईल. तसेच वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मागाठणे ते गोरेगाव हा डीपी रोड येणाऱ्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार भातखळकर यांनी दिले.


प्रास्ताविक माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी केले सूत्रसंचालन भाजपा उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे यांनी केले यावेळी मंडलाध्यक्ष आप्पा बेलवलकर यांसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार अश्विन अहिरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News