मराठी पाऊल पडते पुढे! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, December 15, 2022

मराठी पाऊल पडते पुढे!

 



मुंबई : भाषा ही मानवाला दिलेली देणगी आहे. भाषेद्वारा मनुष्य अभिव्यक्त होत असतो. माणसाच्या अभिव्यक्तीचा विकास शालेय वयातच विकसित होत असतो. विद्यार्थ्यांच्या या अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील निवासी शाळेत भाषा अभिव्यक्तिसाठी विविध स्पर्धांचे आयोजन इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती दिपिका जैन यांनी केले होते. या स्पर्धेचा एक भाग म्हणून इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी काव्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रसग्रहण व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 


       मराठी विषयाचे शिक्षक मिनल परेरा व संजीवनी नारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक  गोविंदराजन श्रीनिवासन यांनी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेबरोबरच महाराष्ट्राची अस्मिता व मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News