विद्यार्थ्यांत वैज्ञानिकदृष्ट्या सृजनशीलता व कल्पनाशक्तीच्या विकासास चालना देणे हा विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, January 14, 2023

विद्यार्थ्यांत वैज्ञानिकदृष्ट्या सृजनशीलता व कल्पनाशक्तीच्या विकासास चालना देणे हा विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

 



किनवट : वैज्ञानिक विचार, तत्व व वैज्ञानिक उपागम याच्या कौशल्याचा वापर करून निर्मिलेल्या व सहज वापरता येणाऱ्या प्रदर्शनीय वस्तू , प्रकल्पाच्या मांडणीतून  विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीयदृष्ट्या सृजनशीलता व कल्पनाशक्तीच्या सहभागास चालना देणे हाच विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आहे. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.

        येथील सरस्वती विद्या मंदीर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत आयोजित '50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्य' उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्र प्रमुख रमेश राठोड, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, संस्था सचिव प्राचार्य कृष्णकुमार नेम्माणीवार, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

           पुढे बोलतांना श्री महामुने म्हणाले की, वैज्ञानिक जाणीवांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअं तराळ विज्ञान केंद्रास सर्व शिक्षक- विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. यावेळी 80 विद्यार्थ्यांनी आपल्या प्रदर्शनीय वस्तू-प्रकल्पासह यात सहभाग घेतला होता. 

      या प्रदर्शनातील निकाल पुढील प्रमाणे (कंसात प्रयोगाचे नाव ) : 

इयत्ता 6 वी ते 8 वी उच्च प्राथमिक गट : प्रथम- अर्णव कोट्टावार, स. वि. मं.मा. शा.,किनवट (हायड्रॉलिक हायवे) , द्वितीय - अथर्व बेलर , ग्यानज्योती पोदार लर्न्स स्कूल , बेंदीताडा (हायड्रॉलिक प्लँट), तृतीय- प्रगती मजरवाड, जि.प.हा. शिवणी (स्मार्ट सुरक्षा), चतुर्थ - सुजय कलाले, स.वि.मं.मा. शा.,किनवट (फायर अलार्म अर्थक्वेक),

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट : प्रथम - सतिश जाधव ,जि.प.हा. कोसमेट (टाकाऊ वस्तूपासून वीज निर्मिती) , द्वितीय - संकेत राठोड, स.वि.मं.मा. शा.,किनवट ( रिजनरेशन बार्कर सिस्टीम), तृतीय - मंथन लोखंडे, म. ज्यो. फुले मा. वि. व क. महा. गोकुंदा ( फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन गॅस) चतुर्थ-संदीप तुपेकर, म. ज्यो. फुले मा. वि. व क. महा. गोकुंदा (ग्रास कटर),

प्रयोगशाळा सहायक/ परिचर गट : प्रथम - सुरेश मेश्राम ,जि.प.हा. कोसमेट (उपयुक्त वनौषधी )

          प्रियंका सामशेट्टीवार यांनी सूत्रसंचालन केले. संजय तिरमनवार यांनी आभार मानले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक रेणुकादास पहुरकर , संजय चव्हाण, सुनिल पाठक  आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News