मागासवर्गीय वसतीगृह व सामाजिक न्याय भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 18, 2023

मागासवर्गीय वसतीगृह व सामाजिक न्याय भवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

 



किनवट : सामाजिक न्याय विभागा अंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीय वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी,या मागणीचे निवेदन बुधवारी (ता.१८) नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी व तहसीलदार डाॅ. मृणाल जाधव यांना देण्यात आले.

          निवेदनात असे नमूद करण्यात आले  की, किनवट विधानसभा क्षेत्रातंर्गत अनुसूचित जातीची ३५ ते ४० हजार लोकसंख्या आहे. त्यांच्या पाल्यांना शिक्षणा करिता तालुक्याच्या ठिकाणी किनवट येथे यावे लागते. येथे वस्तीगृह उपलब्ध नसल्याने  व विद्यार्थ्यांची आधीच आर्थिक बाजू कमजोर असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेणे अडचणीचे जाते. यापूर्वी वसतीगृहाच्या नवीन इमारत बांधकाम करीता असलेला निधी  जागा उपलब्ध नसल्याने परत गेला होता. वसतीगृहासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेली नगरपरिषदेच्या मालकीची मोकळी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी व नवीन इमारती साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

       निवेदनावर मागासवर्गीय विद्यार्थी कृती समितीचे ऍड. सम्राट मिलिंद सर्पे, अश्विन लगेलीवार, विनोद चंद्रकांत भरणे , निखिल वि. कावळे, ऍड जी. एस. रायबोळे , माधव कावळे, सुरेश जाधव, रवि कांबळे, विवेक ओंकार , शिलरत्न पाटील, सतिश कापसे, संघर्ष घुले, स्वप्नील सर्पे, प्रशीक मुनेश्वर, अनिल कांबळे, आकाश सर्पे, आनंद कावळे, सुगत भरणे, विनय सुद्दलवार, निवेदक कानिंदे, विनोद रावळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

         निवेदनाच्या प्रति केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News