पत्रकारिता पदव्युत्तर एम.जे.एम.एस. अभ्यासक्रमात शारदा कुलकर्णी विद्यापीठात सर्वप्रथम ; ‘पत्रमहर्षि स्व.हरी सखाराम तुंगार आर्यसेवक’ सुवर्णपदकाच्या मानकरी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, January 17, 2023

पत्रकारिता पदव्युत्तर एम.जे.एम.एस. अभ्यासक्रमात शारदा कुलकर्णी विद्यापीठात सर्वप्रथम ; ‘पत्रमहर्षि स्व.हरी सखाराम तुंगार आर्यसेवक’ सुवर्णपदकाच्या मानकरी

 



नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे उन्हाळी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या (एम.जे.एम.एस.) पत्रकारिता व जनसंवाद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परिक्षेत श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी शारदा देविदास कुलकर्णी यांनी विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. यासोबतच विद्यापीठातून एम.जे.एम.एस. पत्रकारिता व जनसंवाद अभ्यासक्रमात सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास दिल्या जाणार्‍या “पत्रमहर्षि स्वर्गीय हरी सखाराम तुंगार आर्यसेवक’ या सुवर्णपदकाच्याही शारदा देविदास कुलकर्णी या मानकरी ठरल्या आहेत. 

या यशाबद्दल श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयातर्फे शारदा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. विकास कदम, प्रा.अमोल धुळे, प्रा. संजय नरवाडे, प्रा. विपिन कदम, विलास वाळककीकर, रोहित माळी, बालाजी कुलकर्णी, भारत सोनटक्के आदित्य कुंटे, श्वेता पाटील आदी उपस्थित होते.

त्यांच्या यशाबद्दल आई मंगला कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शरदचंद्र कुलकर्णी, सौ. निता कुलकर्णी,  शंकर पुरंदरे, सौ. शुभदा पुरंदरे, सुरेश कुलकर्णी, सौ. वैशाली कुलकर्णी, शेखर पुरंदरे, शशांक पुरंदरे, सोहम कुलकर्णी, श्रेयस कुलकर्णी, समीरा कुलकर्णी, विहान कुलकर्णी  यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News