राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचे आयोजन : उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून किनवटच्या तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचा होणार सत्कार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, January 24, 2023

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचे आयोजन : उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून किनवटच्या तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचा होणार सत्कार

 



नांदेड (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी  हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी व मतदान प्रक्रियेतील आपल्या मताचे पावित्र्य मतदारांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

          स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठातील सिनेट सभागृहात दुपारी 12.30 वा. होणाऱ्या या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाण पत्र देऊन होणार सत्कार

         याच कार्यक्रमात 13 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त खालील उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाण पत्र देऊन  सत्कार करण्यात येणार आहे.


1. उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी-ब्रिजेश पाटील, मतदार नोंदणी अधिकारी (84-हदगाव विमसं ),

2. उत्कृष्ट सहायक मतदार नोंदणी अधिकारी- श्रीमती डॉ. मृणाल जाधव तहसिलदार, किनवट व श्री. काशीनाथ पाटील, तहसिलदार, मुखेड

3. उत्कृष्ट नायब तहसिलदार (निवडणूक) :

श्री. डी. एन. पोटे (ना.त. निवडणूक) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदड व श्री. रामराव पंगे (ना.त. निवडणूक) ता. देगलूर

4. उत्कृष्ट अव्वल कारकून श्री. फैय्याज अहेमद युसुफ खान, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

5. उत्कृष्ट महसूल सहायक : श्री. शरद बोरामने, महसूल सहा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड, श्री. संदीप भुरे, महसूल सहा. ता. मुखेड व श्री. गजानन मठपती, महसूल सहा. ता. मुदखेड

6. उत्कृष्ट संगणक चालक : श्री. विनोद मनवर, जि.अ.का. नांदेड, श्री. समीर पठाण, मतदार मदत केंद्र, हदगाव, श्री. बबलू महेबूबसाब अत्तार, मतदार मदत केंद्र, मुखेड.



सत्कार मुर्तींची नावे याप्रमाणे आहेत - अनुक्रमे विधानसभा मतदारसंघ : बी .एल. ओ. चे नाव (कंसात मतदान केंद्राचे नाव ) 

83 - किनवट :श्री. संगमेश्वर शिवलींग शेटे (जि.प.प्रा.शा. पाटोदा बु.), 84 हदगाव :श्री. खडबडे डी.एस (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, धानोरा (ता.) ) , 85 -भोकर : श्री. मरशिवणे जी.बी. (जि.प.प्रा.शा. सावरगाव माळ ) , 86 - नांदेड उत्तर :श्री. उध्दव रंगनाथराव कदम (सहकार महर्षी पद्मश्री शामरावजी कदम प्रा.शा. लिंबगाव ),

87- नांदेड दक्षिण :श्री. कहाळेकर गणेश शिवानंद (पिंपळगाव मिश्री ), 88 - लोहा : श्रीमती वर्षा नरसिंगराव गरड (जि.प.प्रा.शा. येलुर नवीन केंद्र गोणार ) , 89- नायगाव : श्री. मुंडकर एल.एम. (यादी भाग क्र. 123 ), 90 - देगलूर :श्री. विधमवार बालाजी सटवाजी (जि.प. हायस्कूल, खानापुर), 91 - मुखेड : श्री. कांबळे एस.एम. (जि.प.प्रा.शा. वर्ताळा )


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News