उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या बीएलओंचा सत्कार व विविध स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, January 25, 2023

उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या बीएलओंचा सत्कार व विविध स्पर्धा आयोजित करून राष्ट्रीय मतदार दिन साजरा

 


किनवट : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी  हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी व मतदान प्रक्रियेतील आपल्या मताचे पावित्र्य मतदारांपर्यंत पोहचावेत या उद्देशाने तालुक्यात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. तहसिल कार्यालयात विशेष  कार्यक्रमात उत्कृष्ट मतदार नोंदणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.

         सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले ,भाप्रसे यांनी उत्कृष्ट मतदार नोंदणी बद्दल जिल्हास्तरीय सत्कारासाठी नामांकन मिळाल्या बद्दल सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांचा सर्वप्रथम सत्कार केला. त्यानंतर त्यांचेच हस्ते उत्कृष्ठ बी.एल.ओ. मारोती हनमंत मुलकेवार (शिवाजीनगर) , शोभा देविदास जाधव (दरसांगवी सी.), ज्योती शिवाजी गीते ( वझरा बु.), संध्या दत्तात्रय पांडागळे (कोल्हारी) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच निवडणूक विभागातील यादव देवकते, इनामदार येराजोद्दीन, किशोर कावळे, पाडुरंग अकोले, मनोज कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.


       पाटोदा (बु) येथील आदीम कोलाम जमातीतील नवमतदार अमोल दीपक कुंभेकर, आकाश गुलाब मेश्राम व विकास दडंजे यांना मतदार कार्ड वितरीत करण्यात आले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व सर्वांकडून मतदारांसाठीची शपथ घेतली. यावेळी बीएलओ मारोती मुलकेवार व नवमतदार अमोल कुंभेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

        यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, अनिता कोलगणे व महसूल सहायक उपस्थित होते. मतदार जनजागृतीसाठी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये रांगोळी, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News