किनवट : अभिवक्ता संघाची नवीन कार्यकारिणी शुक्रवारी (ता. 03 ) निवडण्यात आली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली तर सचिव व कोषाध्यक्ष हे बिनविरोध निवडले.
आज सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान अभिवक्ता संघाच्या 50 सदस्यांपैकी 49 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. उपाध्यक्ष पदासाठी ऍड. श्रीकृष्ण राठोड यांनी 25 मत घेऊन प्रतिस्पर्धी ॲड विलास शामिले-सुर्यवंशी (24 मते ) यांच्यावर एका मतीनी विजय प्राप्त केला. अध्यक्ष पदासाठी ऍड. आर.डी. सोनकांबळे यांनी 28 मते घेऊन प्रतिस्पर्धी ऍड. के.के मुनेश्वर ( 21 मते ) यांचेवर आठ मतांनी विजय प्राप्त केला.
विजयी उमेदवारांनी किनवट येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व अभिवक्ता बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचा कसोसीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वरिष्ठ विधीज्ञ ऍड. एस.डी राठोड यांनी काम पाहिले तर त्यांना ऍड. बिपिन पवार व ऍड. सुनील येरेकर यांनी त्यांना सहाय्य केले.
यावेळी सर्वानुमते सचिव म्हणून ऍड. शिरपूरे व कोषाध्यक्ष म्हणून ऍड. एम. एम. बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.




No comments:
Post a Comment