'जलवा तेरा जलवा जलवा ...' अशा देशभक्ती गीतांनी राजगडतांडा शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम गाजला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, February 8, 2023

'जलवा तेरा जलवा जलवा ...' अशा देशभक्ती गीतांनी राजगडतांडा शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम गाजला




किनवट : दारूबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी गीते यासह  'देस रंगीला रंगीला रंगीला देश मेरा रंगीला' , 'जलवा तेरा जलवा जलवा ...' अशा देशभक्ती गीतांनी राजगडतांडा जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम गाजला.

          स्वातंत्र्य व मराठवाडा मुकी संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्ष व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजगडतांडा येथे नुकताच 'शालेय सांस्कृतिक कार्यक्रम' उत्साहात पार पडला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गोरे हे अध्यक्ष, सरपंच देवानंद कोटूळे व उपसरपंच नागोराव रापनवार हे उदघाट्क म्हणून उपस्थित होते.  ग्रा.प. सदस्या अनुराधा नविन जाधव, अश्विनी गजानन राठोड, प्रकाश गोरे, रामराव राठोड (माजी सरपंच) व गंगाधर बट्टलवार, शासकीय गुत्तेदार शेखर चिंचोळकर , मा. गट शिक्षणाधिकारी तथा शा. पो. आ. अधिक्षक अनिल महामुने, केंद्रप्रमुख रमेश खुपसे, पद्माकर कवटिकवार हे प्रमुख अतिथी उपस्थित होते.


           प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर  मुख्याध्यापक गंगाधर पूलकंटवार यांनी सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत व प्रास्ताविक केले.  त्यानंतर   देवा श्री गणेशा, ऐसा देश है मेरा, तेरी मिट्टी मे मिल जावा, अशी देशभक्ती गीते , शेतकरी गीते , ढोलकीच्या तालावर लावणी नृत्य, अंधश्रद्धा निर्मूलन , दारूबंदी, पुलवामा हल्ला या विषयावर नाटकं , अनेक महापुरुषांच्या  वेशभुषा असे एकाऐक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून चिमुकल्यांनी वाहवा मिळविली.  ग्राप सदस्य गजानन राठोड यांच्या मनोगतानंतर  प्रमुख अतिथी मा. गट शिक्षणाधिकारी तथा शा. पो.आ. अधिक्षक अनिल महामुने यांनी मार्गदर्शन केले. 


           ललिता येलमेवाड, सत्यभामा भगत, किसन कर्णेवार,  रघुनाथमामा यांनी विद्यार्थ्यांची वेशभूषा केली.  संगणकीय संगीत प्रणाली प्रवीण पिल्लेवार यांनी हाताळली.  सुभाष पडलवार, चंद्रशेखर सर्पे व सुवर्णा वाढई यांनी सूत्रसंचालन केले. प्रेमसागर नेम्माणीवार व मारोती भोसले यांनी आभार मानले.  निचपूरचे पदोन्नत मुख्याध्यापक दीपक डंबाळे यांनी यूट्यूबद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण केले. कार्यक्रमास केंद्रातील शिक्षक प्रदीप पवार, दत्ता शेवाळकर, इब्राहिम शेख, पंडित प्रधान आदींसह गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक, माता-भगिनी , आजी-माजी विद्यार्थी यांनी रसिक म्हणून उपस्थित राहून साद देत सदर कार्यक्रमाचा आनंद घेतला.



No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News