नादेड : सहकार क्षेत्रात काम करणे कठीण असले तरी,गोदावरी अर्बन संस्थेने सहकार क्षेत्रात उत्तुंग अशी झेप घेतली आहे. गोदावरी अर्बनचे हे कार्य कौतुकास्पद असून, ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर गोदावरी अर्बनने हा विकास साधला असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारी (दि.२४) नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्यच्या मुख्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, उमेश मुंडे, भाजपचे संतुक हंबर्डे,चैतन्य बापू देशमुख, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्यासह संचालक प्रा.सुरेश कटकमवार,अजय देशमुख सरसमकर, साहेबराव मामिलवाड, प्रधानव्यवस्थापक विजय शिरमेवार,व्यवस्थापक, लेखा विभाग आनंद संगावार, व्यवस्थापक देविदास पोलकर, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, उप-व्यवस्थापक पवन यादव, सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत कदम,सहाय्यक व्यवस्थापक गोपाळ जाधव, अधिकारी गजानन सुर्यवंशी, मुख्यशाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे यांची देखील उपस्थिती होती.





No comments:
Post a Comment