विज्ञान प्रसाराने चिकित्सक बुद्धीला सुलभ कार्य करता यावे याकरिता विभागीय आयुक्तांची संकल्पित इस्त्रो सहल स्तुत्य उपक्रम -शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, February 28, 2023

विज्ञान प्रसाराने चिकित्सक बुद्धीला सुलभ कार्य करता यावे याकरिता विभागीय आयुक्तांची संकल्पित इस्त्रो सहल स्तुत्य उपक्रम -शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे

 


किनवट : विज्ञानाच्या प्रसारामुळे चिकित्सक बुद्धीला तिचे कार्य अधिक सुलभतेने करता येते म्हणूनच औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील इ.5 वी ते 8 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव, थुंबा येथील स्पेस म्युझियम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ऍण्ड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देणेसाठी विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतील हवाईमार्गे शैक्षणिक सहलीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे यांनी केले.

        विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील व जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधनवृत्तीचा विकास व्हावा. विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी. शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी. याहेतूने अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा, आंध्रप्रदेश येथे गुणवत्तापूर्ण शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल. यादृष्टीने जिल्हा परिषद शाळांमधील इ. 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करण्या करिता नयाकॅम्प , किनवट या केंद्रातर्गत आयोजित परीक्षेच्या पाहणी करीता त्या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकुंदा येथे आल्या तेव्हा त्या बोलत होत्या. 

         यावेळी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, प्रधानमंत्री शक्ती अभियान अधिक्षक अनिल महामुने, पर्यायी शिक्षण प्रमुख डी. टी. सिरसाठ , व. सहा. उत्तम पेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड , केंद्र प्रमुख रमेश राठोड, मुख्याध्यापक अशोक नेवळे, भरारी पथक सदस्य संजय भालके, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे, परीक्षा विभागाचे राम बुसमवार उपस्थित होते.

        आम्हालाही हवाईमार्गे सफर करून इस्त्रोची प्रत्यक्ष पाहणी करता येईल या कुतहलापोटी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील लेकरांनी अत्यंत उत्साहाने ही परीक्षा दिली असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतांना दिसत होतं.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News