बसपाच्या आंदोलनाचा दहावा दिवस उजाडला; शासन प्रशासनाची भूमिका संभ्रमात ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 24, 2023

बसपाच्या आंदोलनाचा दहावा दिवस उजाडला; शासन प्रशासनाची भूमिका संभ्रमात !

 



नांदेड : महापुरुषाच्या पुतळ्यासमोरील देशी -विदेशी दारूची दुकाने हटविण्याच्या संदर्भात दि. १५ मार्च पासून सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दहावा दिवस उजाडला असून, बहुजन समाज पार्टीच्या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु शासन प्रशासन संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाला भिम टायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला असुन, नांदेड जिल्हा अधिकारी यांना तसे निवेदन त्यांनी दिले आहे.

         नांदेड शहरांतील रेल्वे स्टेशनच्या समोर संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तांडा बार बंद करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील ज्योती बार बंद करून कायमस्वरूपी हटविणे, अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या समोरील वाईन शॉप व देशी दारूचे दुकान बार बंद करून कायमस्वरूपी हटविणे, गणेश नगर वॉयपॉईंट, पंचशिल धम्मध्वजा जवळील देशी दारूचे दुकान बंद करून कायमस्वरूपी हटविणे, सिडको येथिल माता रमाई चौक या ठिकाणी असलेले वाईन शॉप, देशी दारूचे दुकान व बार बंद करून कायमस्वरूपी  हटविणे या प्रमुख मागण्यासाठी ब.स.पा. च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. महापुरुषाच्या पुतळ्यासमोरील देशी - विदेशी दारूचे दुकाने हटविण्यासाठी बसपा सुरू केलेले आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यासंबधी शासन व प्रशासन काय निर्णय घेईल, हे जाणून घेण्याची जनतेची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शासन व प्रशासन संदर्भात असल्याचे दिसून येत आहे.

बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनिषभाऊ कावळे, दिगंबर ढोले महाराष्ट्र प्रदेश महासचिव, राहुल कोकरे, प्रदेश सचिव, लक्ष्मण वायवळे जिल्हा अध्यक्ष साहेबराव डाकोरे, सखाराम मामा इंगोले,  गणेश राऊत जिल्हा महासचिव, डॉ.कैलास कानिंदे रेणापूरकर जिल्हा सचिव, जितेंद्र गोणारकर जिल्हा सचिव, सटवाजी सोनकांबळे जिल्हा महासचिव, नारायण घुले जिल्हा कार्या. सचिव, श्रीकांत नागणिकर, अर्जुन नरवाडे जिल्हा उपाध्यक्ष, बळीराम निखाते नांदेड शहर अध्यक्ष यांच्या सह बसपाच्या इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आंदोलनास आपली हजेरी लावली. तसेच भिम टायगर सेनेचे  राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News