भोकर येथील ग्रामसेवकास लाच प्रकरणी अटक ; लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाची या आठवड्यातील दुसरी कार्यवाही - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, March 24, 2023

भोकर येथील ग्रामसेवकास लाच प्रकरणी अटक ; लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाची या आठवड्यातील दुसरी कार्यवाही

 



भोकर (प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या रिठ्ठा येथील ग्रामसेवक कर्मचाऱ्यास लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) सापळा रचून पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव गंगाकिशन विठ्ठलराव ऐनलोड आहे,अशी माहिती एसीबीने शुक्रवारी उशीराने दिली आहे.

        सविस्तर माहीती अशी कि यातील तक्रारदार पुरुष, वय 25 वर्षे यांना वारसाहक्काने वडिलोपार्जित घर मिळाले होते. सदर घराची नमुना न 8 अ ला तक्रारदार यांचे नावे नोंद घेण्यासाठी घराचे कागदपत्रे पूर्ण करून ती फाईल ग्रामपंचायत कार्यालय,रिठ्ठा येथे दाखल केली होती. त्यानुसार तक्रारदार यांना वारसाहक्काने मिळालेले वडिलोपार्जित घराची नोंद नमुना न 8 अ ला घेण्यासाठी आरोपी लोकसेवक गंगाकिशन ऐनलोड यांनी तक्रारदार यांना रु. 15,000/- लाचेची पंचासमक्ष मागणी करून तडजोडीअंती रु. 5,000/-  घेण्याचे मान्य केले आहे.

 आज रोजी आरोपी लोकसेवक गंगाकिशन विठ्ठलराव ऐनलोड,वय 44 वर्षे, व्यवसाय नौकरी ग्रामसेवक, (वर्ग-3) ग्रामपंचायत कार्यालय रिठ्ठा, ता.भोकर जि. नांदेड रा. बालाजी अपार्टमेंट, फरांदे पार्क, वाडी बु. नांदेड यांना ताब्यात घेतले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे. डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड यांच्या मार्ग दर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा/तपास अधिकारी स्वप्नाली धृतराज पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा कारवाई पथक पोलीस निरीक्षक श्री राहुल पखाले, मपोहेकॉ मेनका पवार, पोकॉ ईश्वर जाधव,अरशद खान, रितेश कुलथे, यशवंत दाबनवाड, चापोहेकॉ मारोती सोनटक्के, गजानन राऊत, अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड हे पुढील तपास करित आहेत .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News