डॉ.आंबेडकर जयंती आणि रमजान ईद निमित्त कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रलंबित सण अग्रीम सह पाच एप्रिल पूर्वी करावे - इब्टा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, March 26, 2023

डॉ.आंबेडकर जयंती आणि रमजान ईद निमित्त कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रलंबित सण अग्रीम सह पाच एप्रिल पूर्वी करावे - इब्टा

 






नांदेड :महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व पवित्र रमजान ईद निमित्त नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2023 चे मासिक वेतन प्रलंबित सण अग्रीम सह पाच एप्रिल पूर्वी करणे संदर्भातचे निवेदन इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन ( इब्टा ) नांदेडच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे यांना प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांचे मार्फत नुकतेच देण्यात आले. 

       येत्या 14 एप्रिलला संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व याच महिन्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण आहे. हे दोन्ही सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे महा फेब्रुवारी 2023 चे मासिक वेतन आयकर भरण्यात गेलेले असल्याने शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात आहे. 

      त्यामुळे नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2023 चे मासिक वेतन प्रलंबित फेस्टिवल सह पाच एप्रिल पूर्वी अदा करून उपकृत करावे असे असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे. अन्यथा संघटनेस नाईलाजाने आंदोलन करावे लागेल. याची पूर्णता जिल्हा परिषदेवर जबाबदारी असेल असेही या निवेदनात म्हटलेले आहे. 

         या निवेदनावर इब्टाचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोणे, बबनराव घोडके, नागनाथ येरमलवाड, निलेश गोधने, विजय इंदुरकर, शेख अहमद, उत्तम कानिंदे, सदाशिव माने, रमेश मुनेश्वर , विजयकुमार गजभारे, बालाजीराव थोटवे, माधव कांबळे,  वीरभद्र मिरेवाड, मिलिंद राऊत, बाबुराव भोजराज, अजय राठोड आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News