किनवट : बळीराम पाटील महाविद्यालयात भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी (ता. 23) शहीद दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना व समाजशास्त्र विभागाच्या वतीने नियमित नौकरीत नसलेल्या युवकांचे सर्वेक्षण एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत नौकरीत नसलेल्या युवकांचे सर्वेक्षण कसे करायचे. त्याचा समाजाला व राष्ट्राला फायदा कसा होतो . तसेंच यामध्ये रासेयो स्वयंसेवकांची भूमिका काय ? याविषयी मार्गदर्शन रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.बेंबरेटर हे होते. तर प्रमुख पाहुणे रासेयो सल्लागार डॉ. आनंद भालेराव हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले. यानंतर या कार्यशाळेत नौकरीत नसलेल्या युवकांचे सर्वेक्षण कसे करायचे. त्याचा समाजाला व राष्ट्राला फायदा कसा होतो . तसेंच यामध्ये रासेयो स्वयंसेवकांची भूमिका काय ? याविषयी रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने यांनी प्रास्ताविकातून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रासेयो सल्लागार डॉ. आनंद भालेराव यांनी सर्वेक्षण करण्याचे कार्य राष्ट्रीय कार्य आहे.यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करण्याच्या पध्दती आत्मसात होतात व संशोधनातील आभिरूची वाढते.तसेच सर्वेक्षण कार्यास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांनी केला. याप्रसंगी उपस्थित डॉ. लता पेंडलवाड,डॉ. स्वाती कुरमे, प्रा.सतिष मिराशे,प्रा.दयानंद वाघमारे, निखिल खराटे, पवन बुरकुले,मनोज कुमरेबजरंग जेपूरकर,अभय जाधव, विनायक पोतकंटवार, जान्हवी गित्ते,अश्विनी झाडे,पोर्णिमा शिंदे, प्रतिक्षा दराडे,साक्षी नाईकवाड, इ.होते.या कार्यक्रमाला एकूण ५० विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो महीला कार्यक्रम आधिकारी प्रा.सुलोचना जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.पुरूषोत्तम यरडलावार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




No comments:
Post a Comment