नांदेड : शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडी जिल्हा प्रमुखपदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या अदेशान्वये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कार्यकर्ते पटेल जैनोदीन यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
ज्येष्ठ शिवसैनिक पटेल हे गावच्या शाखा प्रमुख ते तालुका संघटक पदापर्यंत पोहचून दिलेली जवाबदारी संभाळत व पक्षाशी एकनिष्ट राहुन कार्य करत आहेत . त्यांच्या कार्य काळात त्यांच्या जाहूर, एकलारा , दापका . विभागात दोन वेळेस जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विजयी निवडूण करण्यात पटेल यांचा मोलाचा वाटा आहे. उशीरा का होईना आता त्यांना पक्षाने न्याय देत जिल्ह्यावर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख नांदेड पद देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील एक सच्या शिवसैनिकांस शिवसेना पक्ष प्रमुखांनी न्याय दिल्याने सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे. यावेळी नांदेड - हिंगोली जिल्हयाचे संपर्क प्रमूख बबनराव थोरात, बीड संपर्क प्रमूख धोंडू दादा पाटील , सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार , जिल्हा समन्वय दशरथराव लोहबंदे, जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा प्रमुख बबन बारसे, दत्ता पाटील कोकाटे, माधव पावडे, युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी शिंदे, जिल्हा संघटक विजय मुंडकर उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, संजय बेळीकर, किसानसेना जिल्हा प्रमुख शंकर पाटील लूट्टे, नांदेड शहरप्रमुख गौरेश कोटगीरे , गजानन हारकरे , मुखेड तालूका प्रमुख नागनाथ लोंखडे , देगलूर तालूका प्रमुख महेश पाटील, शहरप्रमूख शंकर चिंतमवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडे, पत्रकार महमद रफीक शेख सह जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.




No comments:
Post a Comment