बसपाने केलेल्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनास आली जाग आणि लागले कामाला - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, April 5, 2023

बसपाने केलेल्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनास आली जाग आणि लागले कामाला

 


नांदेड ( डॉ. कैलास कानिंदे ) : बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 15 मार्च 2023 पासून व्यसनमुक्त बहुजन समाज, बनेगा शासनकर्ती जमात अभियानांतर्गत महापुरुषाच्या पुतळ्याजवळील देशी व विदेशी दुकाने/ बार  हटविण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनीषभाऊ कावळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ चालू होते. आज 18 व्या दिवशी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड या कार्यालयास जाग आली आणि अंदोलनाच्या धास्तीने सदरील तांडा बारला सील ठोकुन बंद करण्यात आले.

         महापुरुषांच पुतळ्याजवळील देशी व विदेशी दुकाने/ बार हटविण्यासाठी बसपाच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने सील ठोकण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले सदर धरणे आंदोलनास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच राज्य उत्पादन शुल्क कार्यालय यांचेकडून वेळोवेळी सहकार्य लाभले विविध संघटना, सामाजिक संघटना यांनी जाहीर पाठिंबा देऊन सहकार्य केले. तसेच ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, बसपाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News