नांदेड : पौर्णिमानगर येथील ज्येष्ठ नागरिक शेषराव गंगाधरराव (राक्षसे) शिराढोणकर गुरूजी यांचे शुक्रवारी (ता. ०७ ) सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते.
सुमारे २५ वर्षांपूर्वी शिक्षक सेवेतून ते सेवानिवृत्त झाले होते. शिक्षक म्हणून दाभड येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी जवळपास आपला संपूर्ण सेवा काल व्यतीत केला होता. स्मृतिशेष शेषेराव शिराढोणकर गुरुजी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. ०७ ) एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातू ,पणतू असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते दीपक शिराढोणकर यांचे ते वडील होत.




No comments:
Post a Comment