कृतिशील उपक्रमातून राजर्षी शाहूनगरात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 15, 2023

कृतिशील उपक्रमातून राजर्षी शाहूनगरात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा

 



किनवट : गीतगायन , सामान्यज्ञान स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , खाऊ व शुद्ध पाणी वाटप आदी कृतिशील उपकमाचे आयोजन करत महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

           येथून जवळच असलेल्या गोकुंद्यातील राजर्षी शाहू नगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार येथे राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जोतीराव फुले यांच्या १९६ वा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला होता.

        राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी मंगळवारी (ता. ११ एप्रिल २०२३ ) सायंकाळी ७ वाजता पासून गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कामराज माडपेल्लीवार यांनी प्रथम, द्वितीय विमलबाई मुनेश्वर यांनी द्वितीय व भीमराव पाटील यांनी तृतीय क्रमांकाचे परितोषिक  पटकाविले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संस्थापक प्राचार्य सुरेश पाटील व गीतकार व गायक रुपेश मुनेश्वर यांनी काम पाहिले. 

      बुधवारी (ता. १२ एप्रिल २०२३ ) सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक शिल्पा विजय कांबळे, दुसरा क्रमांक भक्ती भगवान वाघमारे आणि लहान गटात प्रथम क्रमांक प्रज्वल प्रमोद भवरे, द्वितीय क्रमांक नंदिनी विजय कांबळे व तिसरा क्रमांक अदिती आनंद गिमेकर यांनी पटकविला.


        गुरुवारी (ता. १३ एप्रिल २०२३ ) आयोजिलेल्या रांगोळी स्पर्धेत गंगासागर विनय वैरागडे यांनी प्रथम , उषा भुजमुले यांनी द्वितीय व  वैष्णवी कर्णेवार यांनी तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषीक पटकाविले. तिन्ही स्पर्धेतील यशवंतांना प्रा. सुभाष गडलिंग, उपा.काबळे  व गायक बालाजी वाढवे यांच्या हस्ते पारितोषीके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

           राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी शुक्रवारी (ता. १४ एप्रिल २०२३ ) सकाळी ७ वाजता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धांत खोब्रागडे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वजाचे  ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर किनवट येथील मुख्य कार्यक्रमासाठी गोकुंदा येथून जाणाऱ्या धम्मरॅलीत सहभागी असलेल्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, खाऊचे वाटप करण्यात आले.

               या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सिद्धात खोब्रागडे, उपाध्यक्ष निवेदक कनिदे, सचिव प्रतिक भाट शंकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर सर्पे, संघटक धम्मदीप भरणे, कार्यकारिणी सदस्य सुमित शेंद्रे, सुबोध पाटील व राजर्षी शाहू नगर येथील सर्वच उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News