मत"दान"देवुन गेल्या दहा वर्षात घर बांधलं ; त्याला कायम टिकवून ठेवा -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 22, 2023

मत"दान"देवुन गेल्या दहा वर्षात घर बांधलं ; त्याला कायम टिकवून ठेवा -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

 



भोकर ( डॉ. कैलास कानिंदे ) : हा भोकर मतदार संघ कै.डॉ शंकरराव चव्हाणांचा आहे. या भागातल्या कार्यकर्त्यांनी  माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन,  मागील काळातील कामाची पावती म्हणून मतपेटीतून भरभरून मतदान केले. म्हणुन आपण गेल्या दहा वर्षात जे घर बांधलं आहे, त्याला कायम टिकवून ठेवा , असे प्रतिपादन डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चव्हाण बोलत होते.  

        सदरील सभेसाठी प्रमुख अतिथी माजी आमदार अमर राजूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, भाराकाँचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, राष्ट्रवादीचे प्रमोद देशमुख कामनगावकर ,भगवान दंडवे, प्रकाश भोसीकर, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिचांळकर , बाळासाहेब रावणगावकर, जगदीश पाटील, गोविंद बाबा गौड, विश्वाबंर पवार, ऍड. शिवाजी कदम,  संजीव कुलकर्णी, मारोतराव कवळे गुरजी, नामदेव आईलवाड उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री चव्हाण म्हणाले की, ही लढाई कृषी उत्पन्न बाजार समिती पुरती मर्यादित नसून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा याची तयारी आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझ्यावर प्रेम करतो, विश्वास करतो या विश्वासाला तडा जावू देणार नाही. तालुक्यातील प्रत्येक गावाचा विकास केला आहे आणि आगामी काळातही करणार आहे. माझे पूर्ण लक्ष तालुक्याचा विकास करण्याकडे आहे. महाराष्ट्रातील युतीची वज्रमूठ बांधून आम्ही काम करणार आहोत. येथील एमआयडीसी मध्ये नवीन दुकाने नवीन गाळे निवडणुकीनंतर होणार आहेत . शेतकऱ्यांच्या सोयी सुविधा बरोबरच हमाल मापाडी यांना सुद्धा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. असे आश्वासन देवुन म्हणाले की, कोणत्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलला एक हाती सत्ता द्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केले. मनोज गिमेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार  मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News