भारतीय डाक विभागाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घ्यावा -अधीक्षक पालेकर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, April 22, 2023

भारतीय डाक विभागाच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घ्यावा -अधीक्षक पालेकर


नांदेड (जिमाका)  : भारतीय डाक विभागामार्फत‍ महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे. ही योजना नारी शक्ती मोहिमेअंतर्गत घोषित करण्यात आली. महिला व मुलीच्या भवितव्यासाठी ही योजना भक्कम आधार ठरणारी असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधिक्षक आर.व्ही. पालेकर यांनी केले.


         ही योजना प्रामुख्याने महिलांसाठी व मुलीसाठी आहे. या योजनेचे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाऊ शकते. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी किमान 1 हजार रुपये ते जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत रक्कम गुंतवू शकतात. कोणतीही महिला किंवा मुलगी या योजनेत खाते उघडून 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत शासनाने घोषित केलेले व्याज दर वार्षिक 7.5 टक्के आहे. व्याज हे चक्रवाढ असून एक वर्ष झाल्यानंतर खात्यातील 40 टक्के रक्कम एकदाच काढता येईल. अपवादात्मक परिस्थीतीत खाते मुदतपूर्व बंद करता येणार नाही असे डाक विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News