"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Monday, May 1, 2023

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण

 
किनवट : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील रामनगर (बाबा रमजान परिसर) व सुभाषनगर येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने  "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" चे लोकार्पण  आमदार भीमराव केराम   यांच्या हस्ते करण्यात आले.


           रामनगर (बाबा रमजान परिसर) येथील लोकार्पण प्रसंगी गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, प्राथमिक आरोग्य केंद्र बोधडी (बु)चे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी  डॉ. मेघा लाटकर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, अनिल तिरमनवार, नीलकंठ कातले, संतोष मरस्कोल्हे, शिवा क्यातमवार, अंकूश जमदाडे, आरोग्य सेवक सुदर्शन बेहेरे, आरोग्य सहायक  एस. एम. बोंबले, आरोग्य सेवक एस. टी. गुरव, आरोग्य सेविका एस. एम. वाढई, आदींची तसेच सुभाषनगर येथील लोकार्पण प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र राजगडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐटवार, सुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश रायघोळ, माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन, आरोग्य सहायक व्ही. एन. घोसकुलवार, औषधं निर्माण अधिकारी चाटे, स्टाफ नर्स (पुरुष) शीरडे, आरोग्य सेविका आर. एम. नागभिडे आदींची उपस्थिती होती.No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News