आमदार भीमराव केराम यांचे हस्ते राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाने महाराष्ट्र दिन साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Wednesday, May 1, 2024

आमदार भीमराव केराम यांचे हस्ते राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाने महाराष्ट्र दिन साजरा

 

किनवट : येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण प्रसंगी माननीय आमदार भीमराव रामजी केराम , सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी मेघना कावली(भाप्रसे) , तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर, माजी पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी , गायक कलावंत विद्यार्थी व विविध वेशभुषेतील चिमुकले अंगणवाडीतील विद्यार्थी

किनवट : येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ आमदार भीमराव रामजी केराम यांचे हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.

    राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पुजनानंतर महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिवस समारंभ 83- किनवट विधानसभा मतदार संघाचे माननीय विधानसभा सदस्य भीमराव रामजी केराम यांचे हस्ते राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी मेघना कावली,भाप्रसे व तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

     प्रा. आम्रपाली वाठोरे यांच्या मार्गदर्शना खाली तबला विशारद  प्रा. शिवकुमार कोंडे यांच्या साथीने इशिता शिरीष पत्की (संवादिनी साथीसह ), पद्मश्री श्रीराम वळसंगकर, आधिष्ठानी अनिलकुमार महामुने, ऋचा रमाकांत चक्रवार, धनश्री श्रीराम वळसंगकर या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत व ही माय भूमी ही जन्मभूमी हे देशभक्ती गीत दर्जेदार सादर केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

     बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या मार्गदर्शना खाली गोकुंदा येथील अंगणवाडी क्र. 4 च्या अंगणवाडी कार्यकर्ती अर्चना संजय मरडे , अंगणवाडी क्र. 5 च्या अंगणवाडी कार्यकर्ती अनुसया सुरेश जाधव यांनी चिमुकल्यांना विविध राष्ट्रपुरुष व राष्ट्रनायिकांच्या वेशभूषेत आणले होते.

        यावेळी निवृत्त तहसीलदार उत्तम कागणे, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, नगर परिषद मुख्याधिकारी मुगाजी काकडे, नायब तहसीलदार अनिता कोलगणे, पीएम पोषण योजना अधिक्षक अनिलकुमार महामुने आदींसह विविध कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी , लोकप्रतिनिधी , पत्रकार , नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. महेंद्र मेश्राम यांनी काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.डी. कांबळे, रामेश्वर मुंडे, विजय सुरूशे, शिवकांता होनवडजकर, संतोष मुपडे, सचिन भालेराव, गोविंद पांपटवार, राम बुसमवार आदिंनी परिश्रम घेतले.


*विविध कार्यालयात राष्ट्रध्वजारोहण*

किनवट : पंचायत समितीत राष्ट्रध्वजारोहण प्रसंगी गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव आणि माजी पदाधिकारी , अधिकारी - कर्मचारी


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली (भाप्रसे), तहसील कार्यालयात व किनवट नगर परिषदेत तहसीलदार तथा न.प. प्रशासक डॉ. शारदा चौंडेकर , पंचायत समीतीत गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट साधन केंद्रात गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड यांचे हस्ते तसेच विविध कार्यालयात कार्यालय प्रमुखांचे हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले .

किनवट : गट साधन केंद्रात राष्टध्वजारोहण करतांना गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने आणि सर्व कार्यालयीन अधिकारी कर्मचारीNo comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News