बुद्ध -फुले-आंबेडकर जन्मोत्सवा निमित्त प्रबोधन सभा व सांस्कृतिक संध्या - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 15, 2023

बुद्ध -फुले-आंबेडकर जन्मोत्सवा निमित्त प्रबोधन सभा व सांस्कृतिक संध्या

 



किनवट : भगवान बुद्ध,महात्मा जोतिबा फुले व डॉ . बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव शहर व तालुका समितिच्या वतीने शनिवारी (ता.२०) सायंकाळी ७ वाजता हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानावर प्रबोधन सभेचे व सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.सम्राट सर्पे व संयोजक निखिल वि.कावळे यांनी सांगितले.

   प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी जोतिबादादा खराटे हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून आमदार भीमराव केराम हे उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य मोहन मोरे हे स्वागताध्यक्ष आहेत,तर माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार हे निमंत्रक आहेत. कार्यक्रमास माजी निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र विठ्ठलराव देठे, नगराध्यक्ष अरुण आळणे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, युवानेते ऍड‌.प्रतिक केराम व सुरेश जाधव यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रदीप नाईक, तेलगंनातील बोथचे आमदार बापूराव राठोड, भाजपचे हिंगोली लोकसभा मतदारसंघ प्रभारी रामदास पाटील, भारत राष्ट्र समितीचे बहुजन नेते सुरेशदादा गायकवाड, दादाराव कयापाक, अभियंता प्रशांत ठमके, राहुल प्रधान, श्रीनिवास या.नेम्मानिवार,राम भरणे,विनोद भरणे,दत्ता कसबे,व ऍड.मिलिंद सर्पे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत. उत्तम कानिंदे व प्रा.सुबोध सर्पे हे सूत्रसंचालन करणार आहेत.

       प्रबोधन सभेनंतर 'काळजावर कोरले नाव आमच्या भीमा कोरेगाव' फेम झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे प्रस्तुत 'तुफानातले दिवे',हा बुद्ध-फुले -भीम गितांचा प्रबोधन गितांचा कार्यक्रम होणार आहे.

  परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने संघर्ष घुले, आकाश सर्पे, सतिष कापसे, कामेश मुनेश्वर, अनिल कांबळे, निवेदक कानिंदे, शुभम पाटील, सिद्धांत नगराळे, शिलरत्न कावळे, राजेश पाटील, गंगाधर मुनेश्वर, रवि कांबळे, भीमज्योत मुनेश्वर आदिंनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News