ग्राम पंचायत पोट निवडणूकीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न # 16 ग्रामपंचयतीच्या 21 जागा बिनविरोध *10 ग्रामपंचायतीच्या 12 जागेची 18 रोजी निवडणूक* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, May 15, 2023

ग्राम पंचायत पोट निवडणूकीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न # 16 ग्रामपंचयतीच्या 21 जागा बिनविरोध *10 ग्रामपंचायतीच्या 12 जागेची 18 रोजी निवडणूक*

 



किनवट : ग्राम पंचायत पोट निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे निवडणूक प्रशिक्षण तहसिल कार्यालयातील सभागृहात नुकतेच घेण्यात आले.

       प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेचे इत्यंभूत प्रशिक्षण दिले. तसेच  मल्लिकार्जून स्वामी यांनी मतदान यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक घेतले.

       

10 ग्राम पंचायतीच्या 12 जागेची 18 रोजी निवडणूक

       

        तालुक्यातील 47 ग्राम पंचायतीच्या 85 सदस्य व 2 सरपंच पदांकरिता राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला होता. प्रारंभी अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातून निवडणूक लक्षविणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रासोबतच दाखल करावे , असे जाहीर केले होते. अर्ज दाखल करण्यास 2 मे ही शेवटची तारीख असतांना सुद्धा अत्यल्प अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर ही अट शिथील केल्याने अनेकांनी आपली उमेदवारी दाखल केली.

          उमेदवारी मागे घेणे व छाणणीनंतर 16 ग्राम पंचायतीतील 21 जागा बिनविरोध झाल्यामुळे आता 10 ग्रामपंचायतीतील 12 जागे करिता गुरुवारी (ता.18) निवडणूक होत आहे. सक्रुनाईक तांडा व फुलेनगर येथील सरपंचासह सर्व जागेसाठी निवडणूक घोषित झाली होती. परंतु या दोन्ही गावातून एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे येथे निवडणूक नाही. विस्तार अधिकारी (पंचायत) व्ही. बी. कांबळे , ए. एन. बडे व एस. एस. कासार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. 

         निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाचे नितीन शिंदे, संदीप पाटील, इनामदार, देवकते आदी परिश्रम घेत आहेत.

निवडणूक होणाऱ्या जागेचा तपशील : ग्राम पंचायत (कंसात प्रभाग क्रमांक ) पुढील प्रमाणे -

अनुसूचित जमाती स्त्री राखीव : लिंगी (3) , कोपरा (1), मांडवा कि (2), येंदापेंदा (2), बेल्लोरी ज (2), दिगडी मं (1), चिखली बु (1 व 3), आंदबोरी चि (1)

सर्वसाधारण : मलकापूर- खेरडा (2), अनुसूचित जमाती : चिखली बु (2), पिंपळगाव सि (1)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News