लॉसएंजेलेस (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अमेरिकेतील लॉस एंजेलेस या शहरात श्रीलंका थायलंड व जपान आदी सर्व देशांचे बुद्ध विहार आहेत. मात्र आपल्या भारत देशात बौद्ध धम्माची स्थापना झाली. भगवान बुद्धांचा जन्म भारतात झाला. त्यांना ज्ञान प्राप्ती भारतात झाली. त्या आपल्या भारत देशाचे बुद्ध विहार लॉस एंजिलेस येथे नाही. लॉस एंजेलेस मध्ये सर्व देशांचे बुद्ध विहार आहेत. तिथे भारताचेही बुद्ध विहार उभे करण्याचा आज संकल्प केला असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज दिली.
ना. रामदास आठवले हे सध्या अमेरीका दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या लग्नाचा 31 वा वाढदिवस अमेरिकेतील लॉस एंजेलेस या शहरातील श्रीलंकन बुद्ध विहारात साजरा करण्यात आला.
येथील बुद्धविहारात जाऊन बुद्ध धम्म संघ या त्रीरत्नाला शरण जाऊन ना.रामदास आठवले यांनी सपत्नीक बुद्ध वंदना घेऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केला.यावेळी अमेरिकेतील बौद्ध धम्म चळवळीबाबत चर्चा केली. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात केलेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तनाची जागतिक स्तरावर चर्चा झाली असून त्याची माहिती देणारे विहार भारतीयांतर्फे येथे उभारण्याची गरज आहे. याबाबत येथील भिक्खू संघाशी चर्चा केली असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी उपासिका सीमाताई आठवले; पुत्र जीत आठवले आणि एम. एस. नंदा आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment