परिक्षित अवसरमोल यांचे उज्ज्वल यश! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers


Thursday, May 18, 2023

परिक्षित अवसरमोल यांचे उज्ज्वल यश!

 


मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेचे क्रीडा शिक्षक  विजय अवसरमोल यांचे सुपुत्र परीक्षित अवसरमोल यांनी अमेरिकेतील टेक्सास युनिवर्सिटी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी अँन्ड मैनेजमेंट डिग्री (MS) प्राप्त करून उज्ज्वल यश मिळवले आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      परिक्षितचे आई- वडील दोघेही शिक्षक आहेत. परिक्षित हा लहानपणापासूनच हूशार व क्रीडाप्रेमी होता. भारतातील हजारो विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी आपली भारतीय संस्कृती व परंपरा विदेशातही जपून ठेवली आहे. या परंपरेचा आणि संस्कृतीचा मला अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया परिक्षित यांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. 

        आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली व गुरुजनांच्या आशीर्वादाने मला हे यश मला प्राप्त झाले आहे. भारतीय शिक्षण व भारतीय विद्यार्थी परदेशातही अग्रेसर आहे अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News