किनवट : येथील पंचायत समिती सभागृहात गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीरात' योजनांची माहिती व समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अंमलबजावणी समिती अध्यक्षा तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.
राज्यातील महिलांकरिता शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार महिला व बाल विकास विभागाच्यावतीने "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान तालुकास्तरीय शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात खासदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, नायब तहसिलदार अनिता कोलगणे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनिषा निंबाळकर, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, ऍड. दिलिप काळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे नियोजन अधिकारी शंकर साबरे हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा या कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment