शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यासाठी खाजगी शाळेतील शिक्षकांनी नावे द्यावीत -गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, May 31, 2023

शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यासाठी खाजगी शाळेतील शिक्षकांनी नावे द्यावीत -गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने

 


किनवट : स्पर्धात्मक वातावरणात आपल्या विषयज्ञानात वृद्धी करून स्वतःची गुणवता सिद्ध करण्यासाठी आयोजिलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यासाठी खाजगी अनुदानीत विनाअनुदानीत शाळेतील शिक्षकांची नावे केंद्रप्रमुख यांचेकडे सादर करावीत असे आवाहन गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा रा. बने यांनी केले आहे.

      औरंगाबादचे विभागीय आयुक्त यांनी ता. 10 मे रोजीच्या जा. क्र. 2023 विशा / नियो- 6 / प्र. क्र. / कावी - 86 या पत्रान्वये शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठी इयत्ता 1 ली ते 10 वी स शिकवणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील  सर्व शिक्षकांना बसवण्यासाठी आदेशित केले होते. परंतू बुधवारी (ता.31) दूरचित्रवाणी सभेत जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आता या परिक्षेस जिल्ह्यातील सर्व खाजगी अनुदानीत व विनाअनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील इयत्ता 1 ली ते 10 वीस  शिकविणाऱ्या शिक्षकांनाही बसता येणार आहे. तेव्हा सर्व शिक्षकांनी आपल्या मुख्याध्यापकांद्वारे दिलेल्या (Excel sheet ) एक्सल शीटमध्ये त्वरीत माहिती भरावी तसेच मुख्याध्यापकांनी परिक्षेस बसणाऱ्या शिक्षकांची नावे केंद्र प्रमुख यांचेकडे त्वरीत सादर करावी असे आवाहन पंचायत समितीचे  गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा रा. बने यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News