किनवट : नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील बौध्द तरुण अक्षय भालेराव यास जातीय द्वेषातून गावातील जातीयवादी लोकांनी अमानुषपणे हत्या केली. या काळीमा फासणार्या घटनेचा किनवट शहरात बौध्द बांधव व युवकांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येवून अमानुषपणे हत्या करणार्या जातीयवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन सहायक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास देण्यात आले. नायब तहसीलदार यांनी हे निवेदन स्विकारले.
निवेदनापूर्वी पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, यातील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी वरीष्ठ स्तरावर संघर्ष करू. बौध्द समाजाला शक्ती दाखविण्याची वेळ आली आहे. या आधीही अशी अनेक जातीयवादी प्रकरणे घडली आहेत. यामुळे आंबेडकरी जनता आता गप्प बसणार नाही. अक्षय भालेराव यास न्याय न मिळाल्यास यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने, मोर्चे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, या खुन प्रकरणात सक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अक्षय भालेराव हा युवक अल्पसंख्यांक बौध्द प्रवर्गातील असल्याने हे खुन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून अतिजलद निकाल देण्यात यावा, या प्रकरणात प्रामाणिक व अभ्यासू सरकारी वकील नेमण्यात यावा, युवकाच्या कुटूंबातील सर्व व्यक्ती व साक्षीदारांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, पीडित कुटूंबाला तात्काळ 1 कोटी रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी, कुटूंबातील एका व्यक्तीस तात्काळ शासकीय नौकरी देण्यात यावी, गुन्ह्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह इतर मागण्या या निवेदनात होत्या. शासनाने या गंभीर हत्याकांड प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींना फाशीची शिक्षा देवून लवकरात लवकर अक्षय भालेराव यास न्याय देण्याचे काम करावे, अशीही मागणी करण्यात आली.
निवेदनावर पीरिपाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, प्रवीण गायकवाड, निखिल कावळे, ऍड.सम्राट सर्पे, कोमलदास भवरे, सुरेश जाधव, शंकर नगराळे, विजय पाटील, अमोल शेंडे, प्रशांत ठमके, विजय कांबळे, राजेश पाटील, सुरेश मुनेश्वर, गौतम पाटील, सुमेध कापसे, आकाश सर्पे यांचेसह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदन देण्यासाठी जात असतांना युवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने रॅलीचे स्वरूप आले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देतांना विजय पाटील, सुगत भरणे, दिलीप पाटील, अशोक कावळे, गंगाधर मुनेश्वर, लक्ष्मण भवरे, राहुल कापसे, दत्ता कसबे, रवि कांबळे, ऋषिकेश लढे, सुरेश नगारे, रंजित पाटील, जयकुमार कयापाक, प्रवीण पाटील, प्रितेश पाटील, दुधराम राठोड, सुधाकर हलवले, सुनील पाटील, सुमेध रावळे, संकल्प कावळे, प्रसन्नजीत कावळे, शुभम भवरे, विनोद रावळे, राहूल घुले, सतीश घुले, आकाश मुनेश्वर, अनिकेत भरणे, राहूल पाटील, राहूल उमरे, संघर्ष घुले, सचिन हटकर, यांचेसह बौध्द समाजबांधव व युवकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला होता.




No comments:
Post a Comment