बहुजन समाज पार्टी किनवटच्या वतीने बोंढार हवेली प्रकरणी निवेदन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 10, 2023

बहुजन समाज पार्टी किनवटच्या वतीने बोंढार हवेली प्रकरणी निवेदन

 


किनवट : बहुजन समाज पार्टी किनवटच्या वतीने  तहसिलदार व उपविभागीय अधिकारी  यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध युवक अक्षय भालेराव खून प्रकरणी कसून चौकशी करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून न्याय द्यावा , तसेच पिडीतास योग्यती आर्थिक मदत करावी, ह्या मागणीचे निवेदन शासनास दिले आहे.

   


   निवेदनात असे नमूद केले की, सदर प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावे, जातीयवादी विरोधी कायदा अंमलात आणावा,  कुटूंबातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, पन्नास लाख रुपये पीडित कुटूंबास देण्यात यावे, सरकारी वकील देण्यात यावे व आरोपीना फाशी द्यावे. हे निवेदन नांदेड झोन प्रभारी प्रा. डॉ. आनंद भालेराव यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी किनवट तालुका अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, महिला आघाडीच्या सुनंदा पाटील, गंगासागर जिंदे, वैशाली नगारे, अरुणा गवळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News