धर्माबाद (चंद्रभीम हौजेकर) : " शांती व ज्ञान" या पुस्तकाचे संपादित करण्यामागचा उद्देश व भूमिका विशद करताना शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांनी म्हणाले की, या पुस्तकात तथागताने सांगितलेली जगाची सुख शांती व ज्ञान जिथे प्राप्त होते त्या बाबींचा समावेश यात करण्यात आला आहे. या पुस्तकात तथागतांची ज्ञान व विज्ञान या क्रांतीकारी सिद्धांताचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. तथागतांनी सांगितलेली ओमनी सायन्स व विज्ञान यावर जास्त महत्त्व देण्यात आले. हे सत्य नाकारता येऊ शकत नाही आणि यातच विश्वाचे कल्याण आहे असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांनी जागतिक शांती परिषदेत आपले विचार मांडताना मत व्यक्त केले.
कोलकत्ता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 29 वी जागतिक शांती परिषदेचे आयोजन वैश्विक राजदुत डॉ. बुद्धप्रिया महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या जागतिक शांती परिषदेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डब्ल्यू एफ बि वाय ओसाका (जपान) चे अध्यक्ष हाकुगा मुरायामा, आणि डब्ल्यू एफ बी वाय बँकाँग( थायलंड)चे जनरल सेक्रेटरी इडानोर थायरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या शांती परिषदेमध्ये अनेक विषयावर मान्यवर, शास्त्रज्ञ यांच्यात चर्चा घडवून आली.
यामध्ये शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांनी संपादित केलेली "शांती व ज्ञान" या पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून जागतिक स्तरावर प्रसारित करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय शांती परिषदेच्या आयोजना मागची भूमिका वैश्विक राजदुत डॉ. बुद्धप्रिया महाथेरो यांनी मांडली.
यावेळी सुसुम ब्रेन वेव्हस इंटरनॅशनल जनरल चे महान शास्त्रज्ञ म्हणून डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांची नियुक्ती करून त्याचा गौरव करण्यात आला.
व तसेच सिद्धार्थ युनायटेड सोशल वेलफेअर मिशनचे कार्यरत अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. सिद्धार्थ जोंधळे संपादित पुस्तकात ओमनी सायन्स व विज्ञान याचा विविध रोगांशी परस्पर संबंध कसा येतो. बुद्धाचे ज्ञान हे विज्ञानवादी कसे आहे. हे या सिद्धांतातून मांडणी केली असल्याचे सांगितले आहे.
यावेळी डॉ. सिद्धार्थ जोंधळे यांनी विश्वाची क्रांती, तरुणांची क्रांती व रोगांची क्रांती आणि तथागतांचे अनंत ज्ञान यावरती शोध निबंध सादर करून आपले विचार प्रकट केले व ते पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, तथागतानी सांगितलेला मूळ सिद्धांत यावर आधारित जगातील तरुणांची सद्यस्थिती व वर्तमान काळातील परिस्थिती, भविष्य काळातील तरुणांची क्रांती, विज्ञानावर आधारित क्रांती, कशी होऊ शकते यावर संशोधन पर सिद्धांत मांडून जगासाठी महान संदेश दिला.
या संपन्न झालेल्या 29 व्या आंतरराष्ट्रीय जागतिक शांती परिषदेला जगातील अनेक देशातून विचारवंतांची , मान्यवरांची व शास्त्रज्ञांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये अनेक विषयावर आधारित चर्चा घडून आले व जागतिक शांती परिषद मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.




No comments:
Post a Comment