माती नाला बांधात भोकर वन विभागाने केला मोठा गैरव्यवहार ; चौकशीकरून कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 12, 2023

माती नाला बांधात भोकर वन विभागाने केला मोठा गैरव्यवहार ; चौकशीकरून कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करणार

 



भोकर /नांदेड ( डॉ. कैलास कानिंदे ) : तालुक्यातील मौजे रिठ्ठा येथील निकृष्ट दर्जाचे माती नाला बांधाचे काम चालु आहे. सदरील माती नाला बंधारा पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा या कामाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी , अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाव्दारे सामाजीक कार्यकर्त्यांनी वनसंरक्षक नांदेड यांना दिला आहे.

     याबाबत निवेदनात असे नमूद केले की, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.भोकर यांनी सन 2022-23 या वर्षी मौजे रिठ्ठा येथे माती नाला बांधचे काम 31.3.2023 पर्यंत करणे गरजेचे असतांना दि 2.6.2023 रोजी कामे सुरुच आहेत. याचाच अर्थ माहे मार्च 2023 चा रोख लेख्यात फक्त कामे झाल्याचे दाखवून खोटे प्रमाणके तयार करुन रोख लेखा विभागीय कार्यालयात सादर केला आहे.

 


   सदरील माती बांध नाला पात्रामध्ये मातीचा बांध घालून पाणीसाठा करणे, पाणी अडविणे, जिरवणे आणि जादा झालेले पाणी सांडीवाटे सुरक्षितपणे काढून देणे असे असताना सुद्धा माती नाला बांधासाठी बॉटममध्ये काळी माती टाकावी लागते ,जे टाकलेली नाही. बांधापासून 15 मीटर अंतरावर खोदकाम करावे लागते ते करण्यात आलेले नाही. बांधाच्या ठीकाणी असलेले नैसर्गीक सागी झाडे अंदाजे 15 ते 20 झाडे ज्यांचे वय 10 ते 15 वर्षाचे होते. ही झाडे तोडून माती नाला बांधाचे काम चालु आहे. याच प्रमाणे इतर ठीकाणी सुध्दा असेच बोगस कामे सुरु आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.भोकर यांनी सन 2022-23 या वर्षी जिल्हानियोजन या डिपीटीसी योजनेतील कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असुन रिठ्ठा येथील काम करताना माती बांधाची धुमसनी योग्य रितीने केलेली नाही. माती नाला बांधचा दर्जा निकृष्ट आहे. जागा निवड अयोग्य आहे. माती नाला बांधात पाणी साठा होत नाही. नैसर्गिकदृष्ट्या तसे ठिकाणही नाही. माती नाला बांधांची गुणवत्ता असमाधानकारक असुन निकृष्ट दर्जाचे माती नाला बांधाचे काम चालु आहे. सदरील रिठ्ठा गावातील माती नाला बंधारा पावसाळ्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा या कामाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी , अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल , असा इशारा निवेदनाव्दारे सामाजीक कार्यकर्ते राजु सोनवाडे, बाळकृष्ण कराड, राजु मेटकर आदींनी वनसंरक्षक नांदेड यांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News