आशा व गटप्रवर्तक यांच्या तक्रारीची सीईओंनी घेतली तात्काळ दखल ; चौकशीची टांगती तलवार ठेवत तालुका समूह संघटकाची केली उचलबांगडी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 13, 2023

आशा व गटप्रवर्तक यांच्या तक्रारीची सीईओंनी घेतली तात्काळ दखल ; चौकशीची टांगती तलवार ठेवत तालुका समूह संघटकाची केली उचलबांगडी

 



किनवट : आशा व गटप्रवर्तक यांच्या तक्रारीची दखल घेत चौकशी पूर्ण होईपर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक यांची माहूर येथील कार्यालयात उचलबांगडी केल्याचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे. सीईओंनी सात दिवसात तकारीची घेतली दखल.

        आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी ता.05 जून 2023 रोजी जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर- घुगे यांची नांदेड येथे प्रत्यक्ष भेट घेऊन होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनात असे नमूद केले होते की, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक जनार्दन काकडे हे मनमानी कारभार हाकत आशा व गट प्रवर्तक यांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. याबाबत तात्काळ  चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.

     तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत अगदी तुटपुंजा मानधनावर तालुक्यातील 193 गावापर्यंत अहोरात्र आदेशाचे पालन करत आशा व गटप्रवर्तक हे काम करत असतात. परंतु येथील तालुका समूहक संघटक श्री काकडे यांच्या मनमानी कारभारावर व त्यांच्या वर्तणुकीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर- घुगे यांच्याकडे ता. 05/06/2023 रोजी तक्रारी अर्ज सादर करून न्यायाची व कारवाईची मागणी केली होती. सदर निवेदनाच्या अनुषंगाने बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

     महिलांनी सामूहिक तक्रारी अर्ज सादर केल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केवळ सात दिवसात म्हणजेच ता.12/06/2023 पत्र क्रमांक 3222 अन्वये श्री काकडे यांना आपण तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका माहूर येथे प्रस्तुत प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पदभार स्विकारावा तसेच सध्याचा किनवट येथील पदभार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तालुका माहूर येथील तालुका समूह संघटक यांचेकडे सुपूर्द करावा असा कार्यालयीन आदेश निर्गमित केल्याने तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीची टांगती तलवार ठेवत तालुका समूह संघटकाची उचलबांगडी केल्याने आशा व गटप्रवर्तक यांच्या वर्तुळात तूर्तास समाधान दिसत आहे.

        


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News