इब्टाच्या निवेदनाची शिक्षण विभागाने घेतली दखल : जिल्हातील शाळा आता सकाळ सत्रात भरविणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 21, 2023

इब्टाच्या निवेदनाची शिक्षण विभागाने घेतली दखल : जिल्हातील शाळा आता सकाळ सत्रात भरविणार

 


नांदेड : तीव्र उष्णता प्रचंड उकाडा पाणी टंचाई व शाळांतील वर्ग खोल्यात पंखे व इतर भौतिक सुविधांच्या कमतरतेमुळे जून मध्ये नांदेड जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात 8 ते 12 या वेळात भरविण्यात याव्या, असे निवेदन इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इष्टा) च्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली असून आता जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरविणार असल्याचा आदेश दिला आहे.

    इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन (इष्टा) केंद्रिय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांना व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांना गुरुवारी (ता.15) निवेदन दिले होते. त्यात असे नमुद केले होते की ,जिल्ह्यात 15 जून पासून शाळांना प्रारंभ झालेला आहे. परंतु जिल्ह्यात तीव्र उष्णता , प्रचंड उकाडा , अनेक भागात पाणी टंचाई व जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांत वर्ग खोल्यात पंखे व इतर भौतिक सुविधांचा अभाव असल्या कारणाने जिल्हयातील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग हैराण आहेत.

     तरी आपणास विनंती करण्यात येते की , चांगला मोठा पाऊस होवून उकाडा व उष्णता कमी होईपर्यंत नांदेड जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात सकाळी 8 ते 12 भरवून उपकृत करावे.

     या निवेदनाची दखल जिल्हा परिषद नांदेडच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी घेतल्याने त्यांच्या मार्गदर्शना खाली

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आपल्या संयुक्त स्वाक्षरीने जा.क्र./जिपना/शिविप्रा/प्रा-25/ 3922 / 2023 या क्रमांकाने मंगळवारी (ता. 20 ) रोजी आदेश निर्गमीत करून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषद तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी उन्हाची तीव्रता व विद्यार्थ्यांची आरोग्य विषयक बाब विचारात घेऊन ता. 20.06.2023 ते 30.06.2023 पर्यंत सकाळ सत्रात खालील प्रमाणे शाळा सुरू राहतील,

*सोमवार से शुक्रवार शाळेची वेळ : सकाळी 8:00 ते 01:00

*शनिवार शाळेची वेळ : सकाळी 8:00 ते 11:00

*15 मिनिटाचे मध्यानंतर राहील.

     वरील प्रमाणे शाळेच्या वेळेत बदल करण्यात येत असून त्याप्रमाणे दैनंदिन तासीकेचे नियोजन शालेय स्तरावरून करण्यात यावे. आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे सूचविले आहे. 

       या निर्णयाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन्हीही शिक्षणाधिकारी व मागणी लावून धरल्याबद्दल इब्टाचे पदाधिकारी यांना शिक्षक, पालक, विद्यार्थी धन्यवाद देत आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News