ग्रामीण नाट्य कलावंत रमेश मुनेश्वर यांना राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार प्रदान - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, June 20, 2023

ग्रामीण नाट्य कलावंत रमेश मुनेश्वर यांना राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार प्रदान

 


 


किनवट : मुंबई येथील साथी नाट्य कला प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी क्षेत्रातील किनवट पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले ग्रामीण नाट्य कलावंत रमेश यादवराव मुनेश्वर यांना विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृहात "राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार " प्रदान करण्यात आला. यावेळी ऍड.नेहा धारूळकर, नाट्य कलावंत भरत जगताप, डॉ. अनुपमा जाधव, विजय जोगमार्गे, अनुराधा धामोडे, संस्थापक अध्यक्ष नटराज मोरे उपस्थित होते.

        नाट्यकलेची मुळातच आवड असलेल्या या ग्रामीण नाट्य कलाकारांने अनेक नाटकात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांच्या ज्वलंत जीवन चरीत्रावर आधरित " क्रांतीसूर्य " या दोन अंकी नाटकात ' जोतीराव फुले ' यांची मध्यवर्ती भूमीका साकारली होती. तर  "महाराष्ट्राचा महार " या दोन अंकी नाटकात ' ब्राम्हण आणि ऋषी ' ची डबल भूमीका केली होती. स्वतः अभिनित आणि दिग्दर्शित केलेल्या " नार्‍याचं लगिन " या हौशी नाटीकेचे दुर्गा आणि गणेश उत्सवात मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगना परिसरात पन्नास पेशा जास्त नाट्यप्रयोग  केले. शासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी निवडणूक विभाग स्वीपकक्षातंर्गत " मी मतदान करणारच " हे पथनाट्य प्रत्येक गावात सादर करून राष्ट्रीय कार्यक्रमात वेगळा ठसा उमटविला. त्यांनी अनेक तीन अंकी नाटकात काम केलेले आहेत. 

      साथी नाट्य कला प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य क्षेत्रातील प्रा.डॉ. महेंद्रकुमार पगारे ( जळगाव ), प्रा. संपत गर्जे ( पुणे ), प्रा.डॉ. श्रीकांत पाटील ( कोल्हापूर ), सचिन कुसनाळे ( सांगली ) आणि

कला क्षेत्रातील सिने संगितकार मिलिंद वाणी ( डोंबिवली ), आंतरराष्ट्रीय चित्रकार रणजीत वर्मा ( माहूर ), नाट्य अभिनेता शिवाजी शिंदे ( ठाणे ), ग्रामीण नाटय कलाकार रमेश मुनेश्वर ( नांदेड ), प्रसिद्ध रांगोळीकार मंच्छिद्र वैती ( पालघर ) असे महाराष्ट्रातून कला क्षेत्रात पाच आणि साहित्य क्षेत्रात पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.

        मुनेश्वर यांना यापुर्वी महाराष्ट्र शासनाचा " राज्य शिक्षक पुरस्कार " देऊन गौरविण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी ग्रामीण नाट्य कलाकाराला " राज्यस्तरीय कला भूषण पुरस्कार " देउन गौरविण्यात आल्याबद्दल प्रसिद्ध नाटककार आयु. तामगाडगे गुरुजी, नाट्य दिग्दर्शक प्रा. कैलास पोपुलवाड, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, रविंद्र जाधव, अनिल महामुने, उत्तम कानिंदे, मिलिंद सर्पे, गोकुळ भवरे, प्रा.डॉ. पंजाब शेरे, महेंद्र नरवाडे,  गणपत गायकवाड, शेषराव पाटील, मिलिंद जाधव, सुरेश पाटील, रुपेश मुनेश्वर, जीवन कोटरंगे, राजु पडगीलवार , गणेश पडगीलवार, रमेश जाधव, शिवा निलगीरवार, रेश्मा भवरे, आदिंनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News