पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, June 23, 2023

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा!

 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या नव्या परीपत्रकानुसार आता शाळेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे शिक्षणात चाललेल्या ढकलगाडीला ब्रेक बसेल अशी मिश्किल प्रतिक्रिया ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केली आहे. 


राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने  शिक्षण हक्क कायद्यात (आरटीई ) सुधारणा केली आहे. आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा  घेतली जाणार आहे. त्यामुळे पाचवी किंवा आठवी मध्ये विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे.या पुर्वी विद्यार्थी नापासाच्या शिक्या पासून दूर होते. विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडूनये ते नाउमेद होऊ नये यासाठी  विद्यार्थी मुल्यमापन पध्दती मध्ये यशस्वी न झाल्यास उजळणी घेऊन परीक्षा घेत असत व पास करत होते शालेय शिक्षण विभागाने एक परीपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार आता विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. 



     शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नव्हते. परंतु, आता इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे या संदर्भातील नवे धोरण जाहीर केले  आहे. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. संबंधित विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


मुल्यमापनाची ही नवी पध्दत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम व प्रगत बनवेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र महाजन या शिक्षकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने मुल्यमापन झाल्याने अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना हुरुप येऊन शाळेतील शिक्षकांनाही स्पर्धात्मक युगात आपला विद्यार्थी कुठपर्यंत पोहचेल याचा अंदाज येईल अशी भावना चित्रकला शिक्षक अभय ठाकरे व्यक्त केली.तर नव्या शैक्षणिक पर्वाची ही नांदी असे मत वरीष्ठ क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी सांगितले

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News