किनवट : रविवारी (ता.25) सकाळी 11 वाजता येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील के. के. गार्डन येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे येथील प्रसिद्ध मार्गदर्शक देवा जाधवर यांचे व्याख्यान व रेसिडेंसिएल कॅम्पचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी , पालक व शिक्षक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राईज अकॅडमी, स्टुडन्ट अकॅडमी आणि प्रबोधन विचारमंच , किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे. युनिक अकॅडमी पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देवा जाधवर यांचे चालू घडामोडी विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व राईज अकॅडमी किनवटद्वारा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शियल कॅम्पचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (भारतीय प्रशासकीय सेवा ) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष राम तावडे तर प्रमुख अतिथी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव , पोलीस निरीक्षक दीपक बोरसे गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने , स्तंभलेखक उत्तम कानिंदे, पत्रकार गोकुळ भवरे हे उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमास उज्ज्वल भवितव्यासाठी सुजाण पालक , विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , असे आवाहन राईज अकॅडमी किनवटचे संचालक लक्ष्मीकांत कापसे, प्रबोधन विचारमंचचे अध्यक्ष राजा तामगाडगे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यार्थी हितासाठी धडपडणारे प्रा. भीमराव घुले, रविराज घुले, प्रबोधन विचारमंचचे कार्याध्यक्ष भीमज्योत मुनेश्वर, सचिव प्रा. अजय पाटील, लक्ष्मण भवरे, प्रा.डॉ. कपिल पाटील, कपिलकुमार भवरे, ऍड . सुनिल येरेकर, आनंद गिमेकर, मुक्तीबोध पाटील, विशाल गिमेकर हे प्रचंड मेहनत घेत आहे.




No comments:
Post a Comment