किनवट : तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवट (दक्षिण) व प्रकल्प किनवट (उत्तर) या कार्यालयाचे अंतर्गत रिक्त असणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन किनवट (दक्षिण) व (उत्तर) च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.
या पदासाठीची किमान शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण उमेदवार असावा. वय 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असून विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहणार आहे. उमेदवार हा त्याच महसुली गावचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी ता. 27 जून ते 11 जुलै 2023 या दरम्यान कार्यालयीन दिवशी / वेळेत (सुटीचे दिवस वगळून) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवट (दक्षिण) व प्रकल्प किनवट (उत्तर) या कार्यालयात विहीत नमुन्यात अर्ज करावेत.
प्रकल्प किनवट (दक्षिण)अंतर्गत : सहस्त्रकुंड, दिग्रस तांडा, बोधडी-1, बोधडी-2 व मानसिग नाईक तांडा या 5 ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी तसेच इस्लापूर-8, रोडानाईक तांडा, परोटी तांडा-1, परोटी तांडा-3, परोटीगाव-1, इरेगाव, सांगवी, नंदगाव तांडा-1, वाळकी, नंदगाव तांडा-2, भिशी1, भिशी 2 , पांगरी 2 , कोल्हारी 2, बोधडी-1, बोधडी-2 ,बोधडी-3, बोधडी-4, बोधडी-7, बोधडी-12, बोधडी-13, बोधडी-14 , बोधडी खु-3, पार्डी खु-2, पार्डी खु-3, शनिवार पेठ, सिंदगी, थारा 1, डोंगरगाव-2, सावरगाव तांडा, माळ कोल्हारी, पिंपरी, धानोरा बे-1, येंदा-1, भंडारवाडी, वाघदारी, धानोरा तांडा-1, कोपरा2, मानसिंग नाईक तांडा, दिपला नाईक तांडा, लोखंडवाडी-2, शिवणी क्र.-2, गोंडजेवली क्र.-2, प्रधान सांगवी, चिखली बु.-2, टिंगनवाडी, पाटोदा, मलकवाडी, चिखली बु-1, रामपूर, दत्तनगर, अप्पारावपेठ-1, कंचली-1, अमलापूर, मार्लागुंडा-2 या 55 ठिकाणी मदतनीस रिक्त पदासाठी आणि
प्रकल्प किनवट (उत्तर )अंतर्गत : फुलवाडी व ठाकुरवाडी या 2 ठिकाणी मिनी अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी तसेच घोटी-2, सिरमिटी, मारेगाव खालचे-2, कमठाला, लोणी, राजगड तांडा-1, राजगड -2, धामनदरी, रायपूर तांडा, मांडवी-7, शिंगोडा तांडा, पळशी-1, लालू नाईक तांडा, पाटोदा बु-3, जवारला-2, मांडवी-10, नागापूर-1, कनकी-1, कनकी तांडा-2, डोंगरगाव, जरूर तांडा-1, जरूर तांडा-2, तलाईगुडा-2, पिंपळगाव-1, माळबोरगाव 1, माळबोरगाव 3, निचपूर-5, पितांबरवाडी मोठी, अंबाडी-1, मोहपूर-4, सिंदगी-2, आंजी, पिंपळशेंडा, पार्डी गाव, उमरी-2, उमरी-3, लिंगी क्र.1, दरसांगवी1, दरसांगवी 2, वझरा बु.-1, निराळा गाव, चिंचखेड गाव, गौरी तांडा, दुन्ड्रा-3, नागझरी 1, गोकुंदा 5, गोकुंदा 6, झेंडीगुडा, गोकुंदा 9, गोकुंदा 10 या 50 ठिकाणी मदतनीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
इच्छूक महिला उमेदवारांनी आवश्यक साक्षांकित कागदपत्रासह, स्वाक्षरीसह व विहीत नमुन्यात परिपूर्ण अर्ज कार्यालयात सादर करावेत. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून यात शासन निर्णयाचे व मा. आयुक्तालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. कोणीही कोणत्याही दलालांच्या अमिषाला /भूलथापांना बळी न पडता आर्थिक व्यवहार करून फसवणूक करून घेऊ नये. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment