शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 25 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 24, 2023

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 25 जून रोजी असे असतील वाहन मार्ग व वाहनतळ

 


नांदेड (जिमाका) : नांदेड येथे रविवार 25 जून रोजी अबचलनगर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था  पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

 

लोहा, कंधार तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने  भगतसिंग चौक-कौठा-एसपी ऑफीस-शिवाजी पुतळा-चिखलवाडी कॉर्नर-यात्री निवास या मार्गाने येतील.  

 

धर्माबाद, उमरी येथून येणाऱ्या वाहनांसाठी यात्री निवास येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. या तालुक्यातून येणारी वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास येथे थांबतील.

 

नायगाव, मुखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने चंदासिंग कॉर्नर-लातूर फाटा-जुना मोढा-अबचलनगर कमान येथून येतील.

 

किनवट, माहूर येथून येणाऱ्या वाहनांसाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली उड्डाणपुलावरून पुढे डावीकडे वळून यात्री निवास-अबचलनगर कमान-फतेहसिंह मंगल कार्यालय येथे थांबतील.

 

सर्व शासकीय वाहने यांच्यासाठी बाबा फत्तेहसिंघजी मंगल कार्यालय अबचलनगर नांदेड येथे वाहनतळाची व्यवस्था केली आहे.

 

नांदेड ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र (सीआरसी) येथे व्यवस्था केली आहे. ही वाहने देगलूर नाका-सीआरसी गेट क्र. 1 द्वारे बाफना फ्लाय ओहर मार्गे गेट क्र. 1 द्वारे प्रवेश करतील. मुदखेड येथून येणाऱ्या वाहनांसाठी कापूस संशोधन केंद्र येथे व्यवस्था करण्यात आली असून ही वाहने देगलूर नाका-सीआरससी गेट क्र. 2 द्वारे प्रवेश आहे.

बिलोली, देगलूर, भोकर येथून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था बाबा पेट्रोलपंप, कापूस संशोधन केंद्रासमोर करण्यात आली आहे. ही वाहने देगलूर नाका मार्गे डावीकडे वळून आत प्रवेश करतील.अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर येथून येणारी वाहने खालसा हायस्कूल नांदेड येथे थांबतील. ही वाहने नमस्कार चौक-शाहीर अण्णाभाऊ साठे चौक-फ्लाय ओहर-म्युझीयम-हिंगोली फ्लाय ओहर खालून उजवीकडे वळून प्रवेश आहे.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांच्यासाठी हिंगोली गेट मैदान नांदेड येथे थांबतील.  पदाधिकारी खाजगी वाहने (चार चाकी व दुचाकी) यांच्या वाहनांची व्यवस्था हिंगोली गेट मैदान नांदेड येथे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News