बाल विवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांची सक्षम कार्यवाही आवश्यक -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत #जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, July 5, 2023

बाल विवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांची सक्षम कार्यवाही आवश्यक -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत #जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 



नांदेड (जिमाका) : बाल विवाह थांबविण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागानी जिल्हा कृती आराखड्यानुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखून कार्यवाही करण्यावर भर दिला पाहिजे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयात बाल विवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. कागणे, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे,  बाल विवाह निर्मूलन प्रकल्पाचे नंदू जाधव व विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


बाल विवाह थांबविण्यासाठी तालुका व ग्रामीण पातळीवरील यंत्रणाचा सहभाग महत्वाचा आहे. बालविवाह थांबविलेल्या मुलींच्या मनोगतावर आधारीत चित्रफितीची निर्मिती करुन ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बाल विवाहामुळे शिक्षण थांबलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 


बाल विवाह जास्त होण्याचे प्रमाण असलेल्या भागात मोठ्याप्रमाणात जनजागृती आवश्यक आहे. येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभेत बालविवाह निर्मूलनाबाबत ठराव तसेच ग्रामपंचायत कार्यालयात  बाल विवाह निर्मूलनाबाबत बोर्ड लावावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधित विभागांना दिल्या.  तसेच येत्या काळात याबाबत लवकरच जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बालविवाह निर्मुल माहिती पोस्‍टरचे अनावर जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.


जिल्हा कृती आराखड्यानुसार येत्या दोन महिन्याच्या कालावधीत बाल विवाह निर्मूलनासाठी संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी माहिती दिली. बाल विवाहाला आळा बसण्यासाठी वेळ प्रसंगी कडक कार्यवाही करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. बाल विवाह निर्मूलन प्रकल्पाचे नंदू जाधव यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News