किनवट : येथील सिद्धार्थ नगर मधील ज्येष्ठ नागरिक महानंदाबाई रामभाऊ नगराळे (93 वर्षे) यांचे गुरुवारी (ता. 6) पहाटे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. 6) सायंकाळी 05.00 वाजता बस आगाराजवळील माहूररोडवर असलेल्या शांतीभूमी बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात 5 मुले, 4 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून ज्योती डीजेचे प्रोप्रायटर गौतम नगराळे व विजय नगराळे यांच्या त्या मातोश्री होत.




No comments:
Post a Comment