किनवट : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोपिकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे 5 व 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता "तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे" आयोजन केले आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने तालुका प्रशासनाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी खासदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत " तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून याचवेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम गिते, देशभक्ती गिते, मराठवाडा : काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे मा. सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके, जिल्हा नियोजन समिती कार्यगट सदस्य प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. डाॅ. पंजाब शेरे हे सहभागी वक्ते आहेत. यांची तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व उत्तम कानिंदे हे प्रकट मुलाखत घेतील.
यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्राम डॉक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे. दोन गटातील बीट स्तरावर प्रथम आलेले संघ तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील. बुधवारी 6 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दोन्हीही दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता गोपिकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सर्व कार्यालयाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी, संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार तथा नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव व गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment