मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा तिव्र निषेध करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 4, 2023

मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा तिव्र निषेध करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची शिवसेनेची मागणी






भोकर ता. 4 :जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावी मराठा समाजाचे लोक आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करत असताना जुल्मी पोलिसांनी  लाठीचार्ज करुन अनेकांना जख्मी केले असून यात महिलांन घरात घुसून मारहाण केली.त्यामुळे आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करुन यांची जवाबदारी स्वीकारुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार राजेश लांडगे यांना निवेदन देण्यात आले.

    शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आरक्षणासाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन अनेकांना जख्मी केले आहे.महिलांना घरात घुसून मारहाण केली.त्यामुळे मिंदे सरकारचा जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीने करत या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करावे व नैतिकता दाखवत गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यावा असेही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनात शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, तालुका संघटक संतोष आलेवाड, चेअरमन साहेबराव पाटील भोंबे, सर्कल प्रमुख रमेश महागावकर,माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर,माजी शहर संघटक सुनील जाधव, पांडुरंग कटकमवाड, संघटक साईनाथ गादेपवाड आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News